सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत रविवारी दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी इस्लामपूर येथे महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे.या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिक पाटील यांनी केले.इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “काळजी आरोग्याची, आपल्या माणसांची”हे ब्रीद घेऊन आरोग्य शिबीरांचा उपक्रम राबविला जात आहे. या शिबिरात मोफत सर्वरोग तपासणी केली जाणार आहे. तसेच मोफत रक्त,लघवी व जरुरी प्रमाणे ईसीजी,रक्तातील साखर तपासली जाणार आहे. डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून मेडिसिन,ह्रदयरोग,स्त्री रोग,सर्जरी,अस्थिरोग,नेत्र रोग,कॅन्सर,नाक, कान,घसा आणि इतर आजारांच्या तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येकाला ५० दिवसांच्या टॉनिकच्या गोळ्या,जंतांच्या गोळ्या देऊन प्राथमिक उपचार मोफत केले जाणार आहेत. शासकीय योजने अंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया मोफत व सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.
प्राचीनतेबरोबरच निसर्गाचं वरदान लाभलेले बेट; एकदा तरी भेट द्या!
कृष्णा हॉस्पिटल कराड,सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली,जयंत नेत्रालय इस्लामपूर, श्री टेके आय क्लिनिक सांगली,मेहता हॉस्पिटल सांगली,सिनर्जी हॉस्पिटल मिरज, सेवासदन हॉस्पिटल मिरज,आदित्य हॉस्पिटल सांगली,स्पंदन हॉस्पिटल आष्टा,श्री.मॅटरनिटी हॉस्पिटल सांगली,शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली आदी नामवंत हॉस्पिटल मधील डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
अधिक माहितीसाठी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे संघटक मो.८३७९९४७०४३,मो.८६०५१६४७८९,तसेच हेल्प लाईन मो. ८०८०७६७२९० या क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करावा,असे आवाहन प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.