सांगली । कामेरी येथील ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांची कारदगा (जि. बेळगाव) येथे २६ रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.कारदगा ही सीमा भागातील साहित्य विकास मंडळ संस्था २५ वर्षे सातत्याने मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करून मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन करीत आहे.
साहित्य संमेलन अध्यक्षपदी पाटील यांची निवड केली आहे.पाटील यांचे साहित्य क्षेत्रातील आजवरचे काम लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश काशीद, उपाध्यक्ष सुनीता कोगले,सुचित बुडके, ठकाणे,प्रकाश भागाजे या पदाधिकाऱ्यांनी कामेरी येथे येऊन पाटील यांना अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिले. समेलन सीमाभागातील सर्वांत महत्त्वाचे समजले जाते.निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.