नवी दिल्ली । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे.आतापर्यंत 196 जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी 119 जागा काँग्रेस, 55 भाजपा, 18 जनता दल धर्मनिरपेक्ष आणि 4 जागा अपक्षांना मिळालेल्या आहेत.
एकूण 224 जागांचा विचार करता आघाडी आणि विजय मिळवून काँग्रेस 136, भाजपा 64, जनता दल धर्मनिरपेक्ष 20 आणि अपक्ष 4 जागांवर आहेत.सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून काँग्रेसनं घेतलेली आघाडी कायम आहे.