बागणी व रेठरे हरणाक्ष येथे ‘जयंत नवरात्र उत्सवा’त महिला राष्ट्रवादीचा रास दांडिया
सांगली । भारतीय सण-उत्सव,परंपरा जपण्यात, सण-उत्सव,परंपरांचे संवर्धन करण्यात महिलांचे योगदान मोलाचे आहे. महिलांची श्रद्धा ही त्यांची नैतिक ताकद असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी बागणी व रेठरे हरणाक्ष येथे वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने “जयंत नवरात्र उत्सवा” निमित्त आयोजित रास दांडिया कार्यक्रम प्रसंगी बोलताना काढले. तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले. जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या रास दांडियामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीपासून सत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत सर्व महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. दांडिया,विविध खेळ,भाग्यवान महिलांचा आकर्षक साड्या देऊन सन्मान आदी उपक्रमांनी महिलांनी धम्माल केली. बागणी, रेठरेहरणाक्ष तसेच परिसरातील गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
बागणीच्या सरपंच तृप्ती हवलदार, फाळके वाडीच्या सरपंच प्राजक्ता चंद, काकाचीवाडीच्या सरपंच रोहिणी जाधव, तालुका सदस्या रुपाली ढोकळे, उषा येवले, लता पाटील, उपाध्यक्षा मनिषा पाटील, सुजाता पाटील, काकाचीवाडी अध्यक्षा संगीता गावडे, संगीता पाटील, वंदना शिंदे, पद्मावती थोरात, माधुरी पाटील, चारूलता पाटील, रेठरेहरणाक्षच्या सरपंच शुभांगी बिरमुळे, तालुका उपाध्यक्ष वैशाली पाटील, सरचिटणीस जयश्री पवार, चिटणीस कल्पना कोळेकर, सदस्या जयश्री कदम, नीता पाटील, रेठरेहरणाक्ष अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्षा पूनम कदम, बिचुद अध्यक्षा शामल सावंत, नरसिंहपूर अध्यक्षा हेमलता चव्हाण, ताकारी अध्यक्षा हर्षदा कदम, भवानीनगर अध्यक्षा ज्योती मेहता यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या व गृहिणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.