रितेश पाटील दुसरा, तर धनाजी पाटील तिसरा
तीन युनिटच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठ्या उत्साहात सहभाग
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या राजारामबापू मॅरेथॉन स्पर्धेत साखराळे युनिटचा (उत्पादन)अतुल मंडले पहिला, वाटेगाव-सुरुल युनिटचा (उत्पादन) रितेश पाटील दुसरा,तर साखराळे युनिटचा (लिकर) धनाजी पाटील तिसरा विजेता ठरला.
करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जिमखाना समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ. योजना शिंदे-पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूं ना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती आवारात लोक नेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
राजारामबापू साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ही स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली. कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव- सुरूल व कारंदवाडीमधील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन झरी नाका, आझाद चौक,संभाजी चौक,गांधी चौक, यल्लाम्मा चौक,कचेरी मार्गे कारखान्यावर येऊन स्व.बापूंच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला. ही स्पर्धा पार पाडण्यास पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने मोठे सहकार्य केले. कारखान्याच्या सुरक्षा,आरोग्य विभागासह सर्वांनी आप-आपली जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेतील विजेते-चौथा क्रमांक-विक्रम खोत केनयार्ड,पाचवा क्रमांक-शरद यादव को-जन, सहावा क्रमांक-राजवर्धन पाटील सुरक्षा, सातवा क्रमांक-श्रीकांत सावंत जनरल, आठवा क्रमांक-विकास देसाई इंजिनिअरिंग, नववा क्रमांक-सागर पाटील को-जन,दहावा क्रमांक-अंकुश देसाई इन्व्हायरमेंट (वाटेगाव- सुरूल),अकरावा क्रमांक-सुशिल वाळखिंडे इंजिनिअरिंग, बारावा क्रमांक-सतिश इरकर इन्व्हायरमेंट, तेरावा क्रमांक-मनोज साळुंखे उत्पादन, चौदावा क्रमांक-संदीप शिंदे इंजि निअरिंग, पंधरावा क्रमांक-अमोल माने केनयार्ड.
कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख, विकास पवार,सचिव डी.एम.पाटील,विजय मोरे,सुनील सावंत,संताजी चव्हाण, उमेश शेटे,महेश पाटील,राजेंद्र चव्हाण,तानाजी खराडे,विश्वनाथ पाटसुते,अनिल पाटील, संभाजी सावंत,संग्राम चव्हाण,आर.एस. पाटील,धनाजी लाड,संजय गुरव,संजय सत्रे, विरसेन गायकवाड,संदीप कदम,संदीप घनवट प्रामुख्याने उपस्थित होते.