फिट म्हणजेच तंदुरुस्त राहणे सोपे आहे, मोफत आहे आणि आजच्या धावपळीच्या जीवनाची सर्वात महत्वाची गरजही आहे. अशावेळी असा एक विश्वासार्ह साथीदार आपल्या सोबत असेल जो आपले भोजन, किती ग्लास पाणी प्यायचे, आपले वजन आणि झोप यासारख्या आवश्यकता अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकत असेल तर याहून सर्वोत्तम काय असू शकेल? यासाठी फिट इंडिया ॲप सुरू करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी 29 ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली. हे ॲप म्हणजे तंदुरुस्ती बाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या त्याच फिट इंडिया चळवळीचा दुवा आहे, ज्याची सुरुवात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिटनेसचा डोस, अर्धा तास रोज’ या मूलमंत्राने केली होती.
फिट इंडिया ॲप उदघाटनाचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
फिट इंडिया ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
अधिक माहिती https://fitindia.gov.in वर उपलब्ध आहे.
असे करा डाऊनलोड
ॲप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही मंचावर हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे आणि हे मोफत आहे.
फिट इंडिया मोबाईल ॲप मोबाईलच्या मदतीने तंदुरुस्तीची पातळी तपासण्याची सुविधा देतो. यामध्ये तंदुरुस्तीच्या पातळीची नोंद तपासणे, आपण किती पावले चाललो याचा मागोवा घेणे, झोपेचा मागोवा घेणे, कॅलरीच्या मात्रेचा आढावा घेणे, योग्य आहार घेणे इ. गोष्टी अंतर्भूत आहेत. यात ॲनिमेटेड व्हिडीओ आणि वैयक्तिक विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या ‘मेरी योजना’ सारखी काही अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत.
लक्षात ठेवण्यासाठी लोक प्रति तासाच्या हिशोबाने सेटिंग करू शकतात आणि वेळोवेळी त्यांच्या तंदुरुस्तीची पातळी आणि दैनंदिन उपक्रमांच्या प्रगतीविषयी माहिती मिळवू शकतात. तंदुरुस्ती आणि जीवनशैलीत बदल करण्यास लोकांना प्रेरित करण्यासाठी लोक त्यांच्या तंदुरुस्तीविषयक आणि उपक्रमांची माहिती इतरांशी सामायिक करू शकतात.