सांगली । बहे (ता. वाळवा) येथील दिलीप श्रीपाद जोशी यांचे पुतणे व प्रशांत श्रीपाद जोशी यांचे सुपुत्र चि.चैतन्य व चि.सौ.कां. समृध्दी (श्री व सौ. संगीता अभय हरदास,रा.चिंचवड,ता. हवेली,जि. पुणे यांची ज्येष्ठ सुकन्या) यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला.
पुणे-चिंचवड येथील आहेर गार्डन येथे झालेल्या या विवाह सोहळ्यास वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी पाटील,माजी उपसरपंच मनोज पाटील,उद्योजक अमोल गुरव,उद्योजक श्रीधर पाटील,डॉ.प्रमोद कुलकर्णी,मानसिंग पाटील,जितेंद्र साळुंखे,भगवान पाटील,प्रतिकेष थोरात,जयदीप थोरात आदी मान्यवरांसह पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.
राजकिय,सामाजिक,अध्यात्मिक,शिक्षण,आरोग्य आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन नववधूवरांना शुभ आशिर्वाद दिले.
दिलीप जोशी,प्रशांत जोशी,सचिन जोशी,श्रेयस जोशी,विनायक कुलकर्णी,संतोष उद्धवराव कुलकर्णी,प्रशांत भालचंद्र हरदास,निशिकांत भालचंद्र हरदास,श्री व सौ संध्या धनंजय देशमुख,श्री व सौ अर्चना अनिल जकाते,प्रा. मकरंद बडवे,ज्योतिष प्राज्ञ अधिक बडवे,मंगेश जोशी,मृत्युंजय कुलकर्णी,सुमित जोशी.अपूर्व बडवे,प्रथमेश बडवे,अथर्व बडवे,अनुज बडवे व कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.