सांगली । औंध (ता. खटाव) येथील कै. हणमंतराव भाऊराव कदम( इनामदार) यांचे नातू, कै. संजय हणमंतराव कदम (इनामदार) यांचे चिरंजीव व बहे येथील वैभव सुधाकर पाटील (सहाय्यक पोलीस आयुक्त) यांचे भाचे चि. नरेंद्र व चि.सौ.कां. शुभांगी (श्री.बाळासाहेब भाऊसाहेब भोसले – पाटील रा. उरुण इस्लामपूर यांची सुकन्या) यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला.
इस्लामपूर येथील डायमंड हॉल येथे झालेल्या या विवाह सोहळ्यास वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईक व मित्रपरिवार आदींनी उपस्थित राहुन नववधूवरांना शुभ आशिर्वाद दिले.
यावेळी हणमंतराव पाटील,गजानन कदम (इनामदार),जयवंतराव पाटील,श्रीकांत पाटील,वैभव पाटील,प्रा. अशोक शिंदे,सचिन कदम (इनामदार),विजय कदम (इनामदार),संजय पाटील,कुलदीप पाटील,अविनाश पाटील व कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.