कोल्हापूर | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदार यादीसाठी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आज दि. ०९ एप्रिल हा शेवटचा दिवस असून, नोंदणी करणाऱ्या नागरिकांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तरी ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची शहानिशा करावी. तसेच मतदार यादीत नाव नसल्यास तत्काळ नोंदणी करावी. त्यासाठी मतदार नोंदणीचा फॉर्म क्रमांक 6 भरणे आवश्यक आहे. नविन मतदार नोंदणी करण्यासाठीच्या प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे.
इथे करा नोंदणी
आगामी लोकसभेला मतदान करण्यासाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे संबंधितांनी नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे. दि. ९ एप्रिल नंतर मतदार नोंदणी अर्ज केलेल्यांची नावे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.