सांगली । बहे (ता. वाळवा) येथील कै.वसंतराव कोंडीबा बडवे यांची नात व अशोक वसंतराव बडवे यांची कन्या आणि ज्योतिष प्राज्ञ अधिक बडवे यांची पुतणी चि.सौ.कां. अमृता व चि.सुमुख (शरदचंद्र दत्तात्रय गुळवणी रा. कोल्हापूर यांचे चिरंजीव) यांचा शुभविवाह रविवारी संपन्न झाला.
कोल्हापूर येथील इंद्रप्रस्थ भवन येथे झालेल्या या विवाह सोहळ्यास वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी बहेचे सरपंच संतोष दमामे,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी पाटील,भाजपाचे राज्य संघटक प्रसाद पाटील,विलासराव पाटील,माजी उपसरपंच मनोज पाटील,आरटीओ अधिकारी रमेश पाटील,उद्योजक अमोल गुरव,प्रा.शशिकांत पाटील,ॲड. कृष्णराव पाटील,मानसिंग पाटील,प्रा. सुनील पाटील,सयाजी पाटील,दिनकर पाटील,प्रसाद यादव,माजी सरपंच सुधीर रोकडे,मनोहर कुलकर्णी,प्रा.रवींद्र पाटील,डॉ. श्रीपाद कुलकर्णी आदी मान्यवरांसह पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.
राजकिय,सामाजिक,अध्यात्मिक,शिक्षण,आरोग्य व इतर सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन नववधूवरांना शुभ आशिर्वाद दिले.
शरदचंद्र गुळवणी,अशोक बडवे,ज्योतिष प्राज्ञ अधिक बडवे,माजी मुख्याध्यापक रवींद्र बडवे,प्रा. मकरंद बडवे,जीवन कुलकर्णी,श्रीराम बडवे,मंगेश जोशी,हणमंत कोकीळ,विशाल कोकीळ,लेखन कोकीळ,अपूर्व बडवे,प्रथमेश बडवे,अथर्व बडवे,अनुज बडवे,अवधूत बडवे,सौरभ बडवे व कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.