सांगली । कासेगाव (ता.वाळवा) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल भगवान पाटसुते (वय ६३ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांनी मुंबई येथे पोलीस खात्यात ३३ वर्षे सेवा केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा,दोन मुली,सून असा परिवार आहे.रक्षा विसर्जन व कार्य विधी बुधवार दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कासेगाव येथील कृष्णा नदीच्या तिरावरती होणार आहे. पुणे येथील एअर इंडियाचे व्यवस्थापकीय अधिकारी विनायक पाटसुते यांचे वडील,उद्योजक मुकुंद पाटसुते यांचे जेष्ठ बंधू,तर कासेगाव शिक्षण संस्थेच्या कोकळे हायस्कुलमधील सहाय्यक शिक्षक निवास महापुरे (गोटखिंडी) यांचे मेहुणे होत.