समाज माध्यम मध्यस्थांसाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । एखाद्या व्यक्तीची बदनामी करणाऱी कोणतीही माहिती प्रमुख समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांनी संबंधित समाज माध्यमांवर प्रदर्शित,प्रसिद्ध,प्रकाशित,प्रसारित,साठवणूक, अदययावत किंवा सामाईक करू नये यासाठी या समाज माध्यमांच्या मध्यस्थांनी योग्य ते प्रयत्न करावेत या उद्देशाने आज केंद्र सरकारने प्रमुख समाज माध्यमांच्या मध्यस्थांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
या सूचनांनुसार त्यांनी :
- चुकीची माहिती आणि डीप फेक्स (बनावट छायाचित्रे आणि व्हिडिओ) विशेषतः अटी आणि शर्तींच्या तरतुदींचा आणि किंवा वापरकर्ता करारांचा भंग करणारी माहिती हुडकून काढण्यासाठी प्रामाणिकपणा दाखवला जात आहे आणि योग्य ते प्रयत्न केले जात आहेत हे सुनिश्चित करावे आणि
- अशा प्रकरणांमध्ये तातडीने आणि आयटी नियम 2021 अंतर्गत विहित केलेल्या कालमर्यादेत कारवाई केली जात आहे आणि
- वापरकर्त्यांनी अशी माहिती/आशय/डीप फेक्स होस्ट करू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि
- अशा प्रकारचा आशय त्या विरोधात तक्रार दाखल झाल्यापासून 36 तासांच्या आत काढून टाकावा आणि
- तातडीने आणि आयटी नियम 2021 अंतर्गत विहित केलेल्या कालमर्यादेत कारवाई सुनिश्चित करावी आणि संबंधित आशय/माहितीची उपलब्धता बंद करून टाकावी.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
माहिती तंत्रज्ञान कायदा आणि नियमातील संबधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात अपयश आल्यास आयटी नियमावली 2021 मधील नियम 7 लागू होईल आणि त्या संस्थेचे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 79(1) नुसार लागू असलेले संरक्षण संपुष्टात येईल, याची आठवण मध्यस्थांना करून देण्यात आली.