सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नव्या कॉलनीतील रहिवाशी संजय नामदेव दाभाडे (वय 55 वर्षे) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.सोमवारी सकाळी पहाटे झोपेतच त्यांना ह्रदय विकाराचा धक्का बसला.ते कारखान्याच्या सॅनिटेशन विभागात काम करीत होते.अतिशय गुणी व मनमिळावू कर्मचारी म्हणून ते सर्वांना परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा,मुलगी सून असा परिवार आहे.रक्षा विसर्जन विधी बुधवार दि.4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता साखराळे स्मशानभूमीत होणार आहे.कारखान्याच्या डिस्टीलरी विभागातील आशितोष दाभाडे यांचे वडील होत.