अधोरेखित ऑनलाइन डेस्क । विनाकारण कोणावर अन्याय होणार नाही आणि खरा गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही असे कामाचे वैशिष्टय असणारा अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप विठोबा मानकर यांची ओळख आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर यांना लहानपणापासून कुस्तीची आवड शारीरिक व्यायामाबरोबरच वैचारीक खुराकही तितकाच महत्त्वाचा असतो. शारीरिक आणि वैचारीक खुराकाची सांगड घालण्याचे काम श्री. मानकर यांनी केले आहे.पोलिस दलात गेल्या 31 वर्षांपासून कार्यरत असून,अनेक गुन्हे उघड केले आहेत.पोलिस दलाने त्यांच्या कामाची दखल घेऊन 1 मे 2021 रोजी पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह दिले आहे.कुस्ती क्षेत्रातून पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असलेले डॅशिंग परंतु तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख.
प्रताप मानकर यांना व्यायामाची प्रचंड आवड.कुस्ती हा तर त्यांचा आवडीचा छंद.कुस्तीचा वारसा आला तो वडील विठोबा मानकर यांच्याकडून.शरीर फिट असल्यामुळे पोलिस दलात काम करत असताना आरोपींना पकडण्यासाठी अनेकदा त्यांना फायदा झाला आहे.श्री. मानकर यांचा वयाच्या 56 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस पाहायला मिळतो.व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांनी घरातच व्यायामशाळा उघडली आहे.सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास उठल्यानंतर प्राणायाम,सूर्यनमस्काराने त्यांचा दिवस सुरू होतो.1997 पासून ते आजपर्यंत न चुकता सूर्यनमस्कार घालत आहेत.व्यायाम हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. कुस्तीबरोबरच सायकलिंग आणि चालणे हे त्यांच्या फिटनेसमागील गुपित.व्यसन तर नाहीच पण वाचन आणि कविता करण्याची आवड असल्यामुळे ताणतणाव जाणवत नाही.गुन्हेगारांना सोडायचे नाही.पण,गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम श्री. मानकर करत आले आहेत.
प्रताप मानकर यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.इस्लामपूर येथे त्यांनी थेट जनतेत मिसळून काम केल्याने लोकांना त्यांचे ते काम विशेष आवडले.गुन्हेगारांना वेळीच वठणीवर आणल्यामुळे पुढे गुन्हेगारीला चाप बसला.पुणे-लोणीकंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम केले.तेथेही अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.कोरोनाच्या काळातील त्यांच्या कामाचे वरीष्ठस्तरवर कौतुक झाले.पुणे-बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे.सध्या ते पुणे येथे क्राईम ब्रँच ला खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.
एक डॅशिंग आणि संवेदनशील अधिकारी अशी पोलीस खात्यात प्रतिमा असलेल्या मानकर साहेबांनी समाजसेवेतदेखील कधी मागे पाहिलेले नाही,त्याचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही.गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम श्री. मानकर करत आले आहेत.