माणसातील माणुसकी जिवंत आहे याचे हे एक सुंदर उदाहरण
आपल्या देशात” दुर्मिळ” असणारा हा ‘प्रामाणिकपणा’… पण अजून सुद्धा माणसातील माणुसकी जिवंत आहे यांचे हे एक सुंदर उदाहरण !

मिझोरमची राजधानी ऐझॉलजवळ महामार्गालगत तुम्हाला अनेक भाजीपाला विक्रीला ठेवलेली दुकानं दिसतील पण त्यांचे मालक मात्र ‘गायब’ असतात. ते गायब नसतात तर गेली कित्येक वर्षं ती दुकानं ‘प्रामाणिकपणा’ या एकमेव गोष्टीवर व्यवसाय करीत आहेत.
तेथील शेतकरी सकाळी माल विक्रीला ठेवतो आणि त्याच्या कामाला निघून जातो.ग्राहक प्रामाणिकपणे त्यांनी घेतलेल्या मालाचे पैसे तेथील पेटीत ठेवून जातात.संध्याकाळी शेतकरी त्याचे पैसे त्या पेटीतून घेऊन जातो.
आजपर्यंत या व्यवस्थेत गैरप्रकार घडलेला नाही.यात आपल्याला शिकण्यासारखे खूप आहे.जपानमध्ये असा माल विक्रीचा प्रकार पाहिला होता.पुण्यातही कोणीतरी वर्तमानपत्र विक्रीचा असा प्रयत्न केला होता. पण त्यांना मात्र वर्तमानपत्राचे पैसे तर नाहीच मिळाले.पण वर्तमानपत्रे ठेवण्यासाठी त्यांनी जी पोती व पैशासाठी पेटी वापरली होती ती पण गायब झाली होती.
धन्य ते विक्रेते आणि धन्य ते ग्राहक असेच म्हणावे लागेल !
साभार । संतोष द पाटील यांच्या facebook वॉलवरून









































































