कामाची कटकट, घड्याळाची टिकटिक, ट्रेनचा थकवणारा प्रवास आणि रोजच्या डेडलाईन्स, या सगळ्यातून एक छोटी विश्रांती मिळावी अशी इच्छा प्रत्येकाची इच्छा असतेच हो ना ?, नाही म्हणूच नका! या इच्छापूर्तीसाठी एमटीडीसीने गणपतीपुळे येथे अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या बोट क्लब मध्ये प्रत्येक प्रकारच्या पर्यटकाला एक परिपूर्ण अनुभव मिळेल,त्यात गणपतीपुळेच्या सौंदर्याबाबत नव्याने सांगण्याची गरज नाहीच!
लाल माती, नारळी पोफळीची झाडं, गार वारा आणि प्रत्यक्ष बाप्पाचं वरदान लाभलेल्या या कोकणातील पर्यटनस्थळी 2020 मध्ये या बोट क्लब उपक्रमाचे उदघाटन झाले. उत्तम स्थितीत असणाऱ्या या बोट मधून एक सुरक्षित तरीही साहसी व थरारक सफारीचा आनंद आपण घेऊ शकाल. तुमच्या मित्र किंवा कुटुंबासह इथे घालवलेला एक दिवस तुमचा वर्षभराचा थकवा घालवून उत्साह देऊन जाईल. जेट स्की ते पॅरासेलिंग ते कायकिंग, आरामदायक लेक क्रूझ किंवा चौपाटीवरील पारंपरिक झोपडी मध्ये आराम असं अजून बरंच काही तुमची वाट पाहतेय. इतकेच नाही तर आमच्या बीच शॅक वर आपण समुद्राचे सुंदर देखावे बघत संध्याकाळ देखील घालवू शकता. तुम्ही फक्त दिनांक ठरवा!
बोट क्लब आठवड्यातील सातही दिवस सकाळी 9:00 पासून ते संध्याकाळी 7:00 पर्यंत सुरु असते.
स्पेशल सूर्योदय क्रूझ सकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान तर स्पेशल सूर्यास्त क्रूझ सायंकाळी 5:00 ते 6:00 पर्यंत असते.
एमटीडीसी गणपतीपुळे रिसॉर्ट जवळच स्थित हा बोट क्लब प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
येथे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. मात्र विविध खेळांसाठी खालील दरपत्रक पहा.
अनु क्र.
. |
खेळाचा प्रकार | सफरीत जास्तीत जास्त इतक्या व्यक्तींना परवानगी | प्रति व्यक्ती दर
सोमवारते शुक्रवार |
जीएसटी (रु.) | एकूण दर (रु.) ) | प्रति व्यक्ती दर शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी | जीएसटी (रु.) | एकूण दर (रु.) |
|
जेट स्की (1) | 1 | 300 | समावेशक | 300 | 300 | समावेशक | 300 |
|
जेट स्की (2) | 2 | 300 | समावेशक | 300 | 300 | समावेशक | 300 |
|
बनाना राइड (4) | 4 | 250 | समावेशक | 250 | 250 | समावेशक | 250 |
|
बम्पर राइड (3) | 3 | 250 | समावेशक | 250 | 250 | समावेशक | 250 |
5. | बोट राइड | 6 | 150 | समावेशक | 150 | 150 | समावेशक | 150 |
6. | कायकिंग (1 व्यक्ती) | 1 | 300 | समावेशक | 300 | 300 | समावेशक | 300 |
7. | कायाकिंग (2 व्यक्ती) | 2 | 400 | समावेशक | 400 | 400 | समावेशक | 400 |
8. | पॅरासेलिंग | 1 | 600 | समावेशक | 600 | 600 | समावेशक | 600 |