महायुती सरकारकडून कराड व मलकापूरसाठी आणखी एक सकारात्मक निर्णय
कराड । दीपावलीच्या मंगल सणानिमित्त कराड व मलकापूर शहरवासीयांना महायुती सरकारकडून मोठी विकासभेट मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या दोन्ही शहरांमधील विविध विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कराड व मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी या दोन्ही शहरांमध्ये अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी यापूर्वीदेखील भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. यात आता आणखी ५ कोटींच्या निधीची भर पडली आहे. आ.डॉ. भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत’ हा ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून कराड येथे शनिवार पेठ स्वराज कॉलनीत चौधरी बंधू स्वीट ते मोटे हॉस्पिटल ते शहा घरापर्यंत बंदिस्त पाईप गटर व रस्ता काँक्रीटीकरण करणे (४० लाख), अंडी चौक ते आझाद चौक रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे (३० लाख), डुबल गल्ली – रंगावेश – विठ्ठल चौक डांबरीकरण करणे (३० लाख), मुजावर कॉलनी येथील अजिम मोमीन घर ते अकबर मोमीन घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (३० लाख) ही विकासकामे केली जाणार आहेत.
तसेच मलकापूर येथील खंडोबानगर साई शिक्षक कॉलनी रस्ता काँक्रीटीकरण व रोडसाईड गटर करणे (३० लाख), आगाशिनगर त्रिमुर्ती कॉलनी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे व रोडसाईड गटर करणे (३० लाख), आगाशिनगर येथे इंद्रप्रस्थ कॉलनी एमडीआर ५५ – माने घर ते गीतांजली क्लासेस रस्ता काँक्रीटीकरण करणे (२० लाख), हायवे शिवाई पतसंस्था ते भोसले फॅब्रिकेशनपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे (६० लाख), बिरोबा मंदिर पाठीमागील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (२५ लाख), बनपुरीकर कॉलनी येथे जोशी यांचे घर ते पाटील यांचे घर रस्ता डांबरीकरण करणे (३५ लाख), पाटील कॉलनी गोकाक पाठीमागील रस्ता डांबरीकरण करणे (२० लाख), विश्रामनगर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (२० लाख), मलकापूर गावठाणमधील शंकर थोरात यांचे घरापासून ते शंकर पवार व बागल यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (२० लाख), प्रभाग क्र. ७ मधील राजू भोपते घर ते मनिषा कांबळे यांच्या घरापर्यंतच्या गटरचे आर.सी.सी. काम करणे (२० लाख), प्रभाग क्र. १ मधील वसंतराव संकपाळ घर ते मगदुम यांच्या घरापर्यंत काँक्रीट गटर करणे (२० लाख), मळाई देवी पतसंस्था ते बने डॉक्टर घरापर्यंत रस्ता काँक्रीटकरण करणे (२० लाख), दत्तनगर आवन बंगला ते बैलबाजारपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (५० लाख) ही विकासकामे केली जाणार आहेत.
या निधीमुळे कराड व मलकापूर शहरातील अनेक काळापासून प्रलंबित असलेली रस्ते व गटारांची कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कराड-मलकापूर परिसराच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, या निधी मंजुरीबद्दल शहवासीयांकडून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.
कराड व मलकापूर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत आहे. नागरिकांना चांगले रस्ते, गटारे आणि पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी येत्या काळातही अधिकाधिक निधी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. शासनाने मंजूर केलेला हा ५ कोटींचा विकासनिधी कराड व मलकापूरकरांना मिळालेली दिवाळीची खास भेटच म्हणायला हवी.
आ.डॉ. अतुल भोसले
जिल्हाध्यक्ष, भाजपा, सातारा









































































