जीएसटी संकलनाचा 2 लाख कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा पार
मागील वर्षाच्या तुलनेत सकल महसूल नोंदीत 12.4 टक्के वाढ
निव्वळ महसूल (परताव्यानंतर) 1.92 लाख कोटी रुपये; मागील वर्षाच्या तुलनेत 17.1 टक्के वाढ
नवी दिल्ली | सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाने एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. देशांतर्गत व्यवहार (13.4% वर) आणि आयातीमधील (8.3% वाढ) मजबूत वाढीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 12.4 टक्के ची लक्षणीय वाढ दिसून येते. परतावे दिल्यानंतर, एप्रिल 2024 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल संकलन 1.92 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.1 टक्केची प्रभावी वाढ दर्शवते.
सर्व घटकांमध्ये सकारात्मक कामगिरी:
एप्रिल 2024 संकलनाची वर्गवारी:
- केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी): 43,846 कोटी रुपये;
- राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी): 53,538 कोटी रुपये;
- एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी): 99,623 कोटी रुपये, ज्यात आयात मालावरील 37,826 कोटी रुपये कर संकलनाचा समावेश;
- उपकर: 13,260 कोटी रुपये, ज्यात आयात मालावरील 1,008 कोटी रुपयांच्या कर संकलनाचा समावेश आहे.
आंतर-सरकारी सेटलमेंट: एप्रिल 2024 मध्ये, केंद्र सरकारने संकलित केलेल्या आयजीएसटी मधून 50,307 कोटी रुपये सीजीएसटी आणि 41,600 कोटी रुपये एसजीएसटी मध्ये दर्शवले आहेत. या नियमित सेटलमेंटनंतर एप्रिल, 2024 साठी सीजीएसटी द्वारे एकूण महसूल संकलन 94,153 कोटी रुपये तर एसजीएसटी द्वारे एकूण महसूल संकलन 95,138 कोटी रुपये आहे.
खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवितो.
तक्ता: जीएसटी संकलनातील कल