सांगली । वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीस ३१ मार्च २०२४ या संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी १ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी दिली.
स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या नावे सुरू केलेल्या आर्थिक संस्थेत संस्थापक राहुल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या संस्थेने संचालक मंडळ व कर्मचारी सभासद व ठेवीदार यांच्या विश्वासास पात्र राहुन राज्यातील एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जावू लागली आहे.
सध्या संस्थेची आर्थिक परिस्थिती: संस्थेचे एकूण भाग भांडवल ११ कोटी ७४ लाख एवढे असून संस्थेच्या ठेवी १३१ कोटी आहेत.संस्थेची इतर बँकांतील गुंतवणूक ४७ कोटी १६ लाख,संस्थेची कर्जे ९३ कोटी ५३ लाख,संस्थेची एकूण मालमत्ता ११ कोटी ६३ लाख एवढी असून संस्थेची वसुली १०० टक्के आहे. संस्थेच्या हेड ऑफिस सहित २० शाखा कार्यरत आहेत.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेतील सर्व शाखाधिकारी, सर्व सेवकांचे परिश्रमाबद्दल अभिनंदन केले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील,संचालक कपिल ओसवाल,रवींद्र आडमुठे, सचिन पाटील,सचिन सातपुते,सागर कोरूचे, अशोक पाटील,सुनील सोनावले,अर्चना खटावकर,शैलजा कागले,सर्व शाखांचे शाखाधिकारी आदी उपस्थित होते.संस्थेचे संचालक कपिल ओसवाल यांनी स्वागत केले. व्यवस्थापक आर. एम. बागडी यांनी आभार मानले.