रविवार दिनांक 24 मार्च 2024
होळी पौर्णिमेच्या आपल्या घरी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा।
ॐ होलिकाय नमः
या मंत्राने होळीचे पूजन करून रात्री होलिका प्रदीपन करावे.
फाल्गुन महिन्यात प्रदोष काळी असलेल्या पौर्णिमेस रात्री होलिका दहन केले जाते.होळी पौर्णिमेच्या संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात त्यातील ही एक कथा….
हिरण्यकश्यूपची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळालेला होता.हिरण्यकश्यपूने होलिकेस सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील .या प्रमाणे तिने केले.परंतु प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलीका जळून गेली आणि प्रह्लाद मात्र जीवन राहिला या आनंदाप्रीत्यर्थ होलिका दहन केले जाते .तसेच या दिवशी दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.