जळगाव । उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावच्या वतीने साहित्य सेवेबद्दल सुप्रसिद्ध लेखक तथा दुसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्राचार्य डाॅ अशोक काळे व सुप्रसिद्ध लेखक प्रा एकनाथ पाटील यांना स्व.प्रा.पन्नालाल भंडारी,स्व. सौ. बदामबाई हेमराज देसर्डा यांच्या स्मरणार्थ बाविसावा सूर्योदय साहित्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
प्रत्येकी रूपये ५ हजार रुपये व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पूर्वी सर्वश्री प्रा डाॅ यशवंत पाठक,वि भा नेमाडे,प्रा डाॅ आनंद यादव,रवींद्र पिंगे,प्रा डाॅ रवींद्र ठाकूर,डाॅ लक्ष्मीनारायण बोल्ली,सुधाकर गायधनी,रा रं बोराडे,लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल,वामन होवाळ,प्रा डाॅ तारा भवाळकर,डाॅ संगीता बर्वे, माया धुप्पड, सुबोध जावडेकर,गिरीश जाखोटीया,प्रा डाॅ म सु पगारे,खलील मोमीन,प्रा डाॅ म रा जोशी,सिसिलीया कार्व्हालो,भीमराव पांचाळे या मान्यवरांना देण्यात आला आहे.