असे असेल या महिन्याचे राशी भविष्य
मेष
मित्रांची साथ मिळेल
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल.सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे.व्यवसाय वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.मित्रांच्या साथीमुळे अडचणीची कामे पूर्ण होतील.ऊसने पैसे,जामीनकीचे व्यवहारापासून दूर रहावे.स्वतःच्या प्रकृतीबरोबर कुटुंबातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल.
वृषभ
रखडलेली कामे मार्गी लागतील
पूर्वार्धात आर्थिक घडी विस्कटल्यामुळे त्रास जाणवेल,कुटुंबात गृहकलह,ताण तणावाचे प्रसंग उद्भवतील.उत्तरार्थात मात्र वातावरण निवळल्याचे चित्र जाणवेल.नविन व्यवसाय सुरू करण्याचे दृष्टीने कल्पना सुचतील.संततीकडुन सुवार्ता समजतील,कोर्टकामात यश मिळेल.रखडलेली कामे मार्गस्य होतील.आय व व्यय समान राहील,त्यादृष्टीने काळजी घ्यावी.वाहन चालविताना काळजी घ्या.मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा.
मिथुन
सहकाऱ्यांशी वाद टाळावा
दुसऱ्याचे ऐकून निर्णय घेतल्यामुळे अडचणीत वाढ होण्याचा संभव आहे.त्यासाठी स्वत: खात्री करूनच पुढे जावे..प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका.प्रेमप्रकरणात फसगत होण्याचा धोका आहे.सहकार्यांबरोबर वाद करीत बसला तरी त्याचा दूरगामी परिणाम जाणवेल,भविष्यात अडचणी निर्माण होतील,पूर्वीचे देणे द्यावे लागल्यामुळे आर्थिक तंगी जाणवेल. आपल्या वेळेची किंमत समजा.त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे.
कर्क
वाद-विवादाचे प्रसंग उद्भवतील
गुरुचे अनिष्ठ भ्रमण आर्थिक-मानसिक-शाररिकदृष्ट्या त्रासदायक असल्यामुळे सावध पावले टाकणे व काळजी घेणे हिताचे ठरेल.वादविवादाचे व भांडणाचे प्रसंग उद्भवतील.त्यातून संयमाने मार्ग काढणे गरजेचे आहे.मानसिक त्रास व पैसे खर्च होण्याचा संभव आहे.व्यवसायातील अडचणी वाढल्या तरी खचून न जाता हेही दिवस जातील या सकारात्मक दृष्टीकोनातून व्यवसाय चालु ठेवावा.स्वयंसेवी कार्य किंवा कुणाची मदत करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी चांगल्या टॉनिकचे काम करू शकते.
सिंह
विवाहाचे योग जुळून येतील
विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास अनुकूलता दर्शविणारे आहे.नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल घडतील.मानसिक त्रास जाणवेल.मात्र उत्तरार्धात तो कमी होईल.आपल्या प्रयत्नांना यश मिळण्याचे दृष्टीने हा कालखंड चांगला आहे.धनाची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा.तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.
कन्या
आरोग्यम धन संपदा
आरोग्याची काळजी घ्यावी. “आरोग्यं धन संपदा” या शुभाषिताची आठवण ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे.आरोग्यात बिघाड झाला तर सगळेच जागेवर थांबेल हे लक्षात घेवून खाणे-पिणे,पथ्य,योग्य आहार,विश्रांती याकडे लक्ष देणे आपल्या हिताचे ठरेल.उत्तरार्धात वाहन जपुन चालवावे,व्यवसाय वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.कुटुंबात कुणी व्यक्तीसोबत वाद होण्याने वातावरण थोडे खराब होऊ शकते परंतु, तुम्ही स्वतःला शांत ठेवा व धैर्याने काम करा तरच, सर्वांचा मूड उत्तम राहू शकतो.
तूळ
शत्रुपक्षाचा त्रास जाणवेल
पुर्वार्धात शत्रुपक्षाच्या कारवायामुळे हैराण व्हाल.उसने पैसे व शब्द अथवा जामिन होताना काळजीपूर्वक व्यवहार करावा.कारण अंगलट येण्याचा धोका आहे.ज्याला मित्र मानता तोच ऐनवेळी शत्रु बनून पुढे येईल.घाईत घेतलेल्या निर्णयात अडचणी निर्माण होतील.त्यादृष्टीने डोके शांत ठेवून मन व मनगटावरती विश्वास ठेवून वाटचाल करावी.तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल.
वृश्चिक
मित्रांचे सहकार्य मिळेल
कौटुंबिक अडचणी सुटण्यासाठी अनुकूल कालावधी आहे.आर्थिक अडचणी सोडविताना मित्रांचे सहकार्य मिळेल.नोकरी व व्यवसायात टिकुन रहाणे हेच हिताचे ठरेल.कोणत्याही भुलथापा,आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता स्वतःच्या हिंमतीने मिळेल त्यात समाधान मानुन पुढे जावे.अंथरून पाहून पाय पसरणे हेच या कालखंडात शहाणपणाचे ठरेल.व्यवसायातील अडचणी कमी होतील.तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे.
धनु
व्यवसायातील अडचणी कमी
आर्थिक प्रश्न सुटण्याच्यादृष्टीने हा कालखंड अनुकुल राहील.गेल्या काही दिवसात झालेला मानसिक त्रास व आलेला ताण-तणाव निवळण्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे.व्यवसायातील अडचणी कमी होवून विस्तारवाडीसाठी प्रयत्न कराल.प्रयत्नाअंती परमेश्वर याचा प्रत्यय करून देणारा कालावधी आहे.तरी आळस झटकून अधिक गतीने काम करणे गरजेचे आहे.तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाही गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल.
मकर
संततीकडुन शुभवार्ता मिळेल
पूर्वार्धात संततीकडुन शुभवार्ता मिळेल.अडकलेले पैसे येण्यास सुरुवात होईल.जवळ बसणारे हितचिंतकच बाहेर जावुन टिंगलटवाळी करतील असा विचित्र अनुभव येईल.व्यवसाय वाढीसाठी अनुकुल काळ आहे.त्यातुन आर्थिक प्राप्तीचेही चांगले योग आहेत.विनाकारण समाजसेवा करत बसण्यापेक्षा व्यवसाय व कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे.
कुंभ
प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल
कोणतेही काम वेळेवर व काळजीपूर्वक अचूक केल्यास यश मिळतेच या उक्तीप्रमाणे वाटचाल करावी.कोर्टाच्या कामात काहीवेळा वाईट अनुभव येईल.कामात दुर्लक्ष करू नका.खचून न जाता संयमाने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा,यश मिळेल. व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा.वाहन चालविताना काळजी घ्या. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा.
मीन
आर्थिक कोंडी निर्माण होईल
वातावरणातील बदलामुळे शारिरीक तक्रारी निर्माण होतील.त्यादृष्टीने काळजी घेणे हिताचे ठरेल.उत्तरार्धात नविन लोकांच्या ओळखी होतील.त्यांचे संबंध उपयोगाचे ठरतील.आवक कमी व खर्च अधिक झाल्यामुळे आर्थिक कोंडी निर्माण होईल.महत्वाचे व कमी महत्वाचे प्राधान्य देऊन वाटचाल करावी लागेल.संयमाने व धैर्याने संकटाचा सामना केल्यामुळे अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल.आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल.जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.
अधिक बडवे
ज्योतिष प्रविण,ज्योतिष प्राज्ज्ञ
भ्रमणध्वनी : 9850818193