GAUTAMI PATIL । सबसे कातील गौतमी पाटील सध्या तिच्या आगामी ‘घुंगरु’ या सिनेमामुळे चर्चेत आहे.लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असून आता या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.100 चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.गौतमी पाटीलचा पहिला सिनेमा घुंगरु हा सिनेमा आहे.तमाशा लोक कलावंत यांच्या जीवनाचे वास्तव मांडणारा ‘घुंगरु’ हा सिनेमा 15 डिसेंबर रोजी राज्यातील 100 स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.
गौतमी पाटीलचा पहिला सिनेमा ‘घुंगरु’ हा सिनेमा आहे.तमाशा लोक कलावंत यांच्या जीवनाचे वास्तव मांडणारा ‘घुंगरु’ हा सिनेमा 15 डिसेंबर रोजी राज्यातील 100 स्क्रीनवर प्रदर्शित होणार असल्याचे या सिनेमाचे दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितले.पंढरपूर येथे ‘घुंगरु’ सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च दरम्यान गौतमी उपस्थित नव्हती.10 डिसेंबर पासून गौतमी पाटील स्वतः या सिनेमाचे प्रमोशन राज्यातील प्रमुख शहरात करणार आहे. लावणी, प्रेम गीत आणि आयटम गीत अशी गाणी चित्रपटात असणार आहेत. देशातील सात राज्यात सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे.
सबसे कातील गौतमी पाटीलची तरुणांमध्ये भलतीच क्रेझ आहे. तिच्या नृत्य अदाकारींवर भले भले राजकारणी पण ठेका धरतात.तिच्या कार्यक्रमात तोडफोड,राडा हे तर ठरलेलं असतं.आपल्या लावणीने गौतमी पाटीलने अनेकजणांना भुरळ पाडली आहे.आता मात्र गौतमी कार्यक्रम नव्हे तर तिचा थेट नवा चित्रपट भेटीला येणार असल्याने चर्चेत आली आहे. गौतमीच्या पहिल्या ‘घुंगरु’ या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता.
बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या सिनेमाची कथा,पटकथा लिहिली आहे. तसेच तेच या सिनेमाचे निर्माते आहेत.‘घुंगरु’ या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील.गौतमी पाटील सोबतच सुदाम केंद्रे,उषा चव्हाण,वैभव गोरे,शीतल गीते या सिनेमात आहेत. देशातील सात राज्यात सिनेमाचे शूटिंग झाले आहे.