सांगली । पलूस पंचायत समिती येथे रोजगार हमी योजनेचे समृध्दी बजेट अंतर्गत ग्राम रोजगार सेवक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण झाले.प्रशिक्षणासाठी झाले .प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन पलूस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी राजेंद्र खरात,अधिक्षक मोरे यांच्या हस्ते झाले.आयोजीत प्रशिक्षणाचा उपयोग गावातल्या तळागाळातील लोकांना निश्चित मदत करेल,असे आवाहन यावेळी मोरे यांनी केले.
गाव समृध्द तर महाराष्ट्र समृध्द असा संदेश देण्यात आला.प्रशिक्षणार्थी म्हणून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सचिन खबाले,प्रमोद बागल यांनी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामरोजगार सेवक यांनी प्रत्येकी पाच कामे व पाच लाभार्थी यांची निवड ग्रामसभेत करून गावात रोजगार हमी योजना राबविण्यात यावी.यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत सचिन खबाले यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रशिक्षणार्थी ग्राम रोजगार सेवक यांना पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या,आपल्या माध्यमातून गावात सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभार्थी यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी यांना कामाचे स्वरूप समजावून प्रत्येक घटकांना रोहयो विभागाच्या माध्यमातून लाभार्थीना लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ग्राम रोजगार सेवकांनी प्रयत्न करावेत.
या प्रशिक्षणाचे नियोजन पलुस पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अविनाश महाजन,तांत्रिक सहाय्यक सुजय आवटी, मैनुद्दीन बिडीवाले,सुयोग पोळ,मच्छिंद्र पाटील,नितीन केंगार,बापुसो जाधव यांनी केले.