स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये किंवा फोनला आग लागल्याच्या घटना आपण अनेकदा वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर पाहिल्या असतील.काहीवेळा तो ग्राहकांचा दोष असतो. तर काही प्रकरणांमध्ये स्मार्टफोन युनिटमधील खराबीमुळे देखील ही घटना घडते. काही लोक फोन चार्ज करत असतानाही सतत फोन वापरत असतात. यामुळे अनेकदा फोनचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. तसेच,अनेकदा फोनबद्दलच्या काही सवयींमुळेही फोनमध्ये असे प्रकार घडतात जे प्रामुख्याने तुम्ही फोन कसा चार्ज करता यावर अवलंबून असतो. खरं तर,चार्जिंग करताना फोनची बॅटरी खूप उष्णता सोडते आणि जास्त गरम झाल्यामुळे स्फोट होऊ शकतो.
आपल्याकडून नकळतपणे काही चुका होतात. या चुका टाळल्यास फोनमध्ये स्फोट टाळता येवू शकतो. फोनचा स्फोट हा साधासुधा नसतो. त्याने जीवितहानी सुद्धा होवू शकते. त्यामुळे फोनचा स्फोट होण्यास कारणीभूत असलेल्या चुकांना वेळीच आळा घालता येवू शकतो.जाणून घ्या डिटेल्स…
फोनला रात्रभर चार्जरवर लावणे खूपच धोकादायक
फोनला रात्रभर चार्जरवर लावणे खूपच धोकादायक आहे. आमच्यापैकी अनेक जणांना अशी सवय लागलेली आहे. फोनला रात्रभर चार्जिंगला लावून झोपी जातात. फोनला रात्रभर चार्जिंगला लावल्याने फोनची बॅटरी फुगते. प्रमाणाबाहेर चार्जिंग केल्याने फोनला नुकसान होऊ शकते. फोनमध्ये स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. फोनला जास्त चार्जिंग केल्याने त्यात ओवरहीटिंग, ओवरचार्जिंग, शॉर्ट-सर्किट सारखी समस्या निर्माण होवू शकते. अनेक स्मार्टफोन आता एका चिपसोबत येतात. बॅटरी लेवल १०० टक्के झाल्यास करंटला अडथळा निर्माण करतो. परंतु, ही जुन्या फोन्समध्ये ही सुविधा उपलब्ध होत नाही.
चार्ज करताना गेम खेळणे
सहसा जे वापरकर्ते गेम खेळत असतात,त्यांची बॅटरी गेम खेळताना कमी होत असते,ते गेम खेळताना त्यांचा फोन चार्जिंगमध्ये ठेवतात.अशा वेळी म्हणजे गेम खेळताना तसेच चार्जिंग करताना,दोन्ही प्रक्रियेत फोनचा सर्वाधिक फटका बसतो.अशा परिस्थितीत पुढे जाऊन अपघात होऊ शकतो.ज्यामध्ये फोनचा स्फोट होऊ शकतो.आणि जर तुमच्या हातात फोन असेल तर तो तुमचा हात देखील खराब करू शकतो,त्यामुळे चार्जिंग करताना गेम खेळणे खूप धोकादायक ठरू शकते.
कोणत्याही चार्जरचा वापर
बर्याच लोकांना त्यांचा फोन कोणत्याही एडेप्टरने किंवा कोणत्याही चार्जरने चार्ज करण्याची सवय असते,कारण काही चार्जर अत्यंत कमी दर्जाचे असतात जे तुमच्या फोनला पूर्णपणे किंवा अंशत: नुकसान करतात,कारण प्रत्येक स्मार्टफोन किंवा प्रत्येक फोनची चार्जिंग क्षमता वेगवेगळी असते.अर्थात, काही 25W चार्जिंगला सपोर्ट करतात तर काही 150W ला सपोर्ट करतात.त्यामुळे फोनला जो चार्जर योग्य असेल त्याच चार्जरने फोन चार्ज करावा.फोन दुसऱ्या चार्जरने चार्ज करू नये.थोडक्यात, फोन मर्यादित वेळेसाठी चार्ज केला पाहिजे आणि फोन 100 टक्के चार्ज न करणे आणि ड्रायव्हिंग आणि गेम खेळताना फोन कधीही चार्ज करू नका हे महत्वाचे आहे.वरील सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास जीवित व वित्तहानी कमी होईल.
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे.लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.)
Recent Posts