युरोपियन देशापेक्षा आपल्या देशात बँकिंग सेवा स्वस्त : ॲड.धैर्यशिल पाटील
सभासदांना १३ टक्के लाभांष देण्याचा निर्णय
सांगली । युरोपियन देशातील बँकींग सेवेपेक्षा आपल्या देशातील बँकींग सेवा स्वस्त आहे. परदेशातील बँका प्रत्येक सेवेसाठी ठराविक टक्केवारी आकारतात. जगात सध्या असेच बँकींग सुरू आहे. आपल्या कडील बँकींग अद्याप सुस्थितीत आहे. बँकींगच्या नियमात बदल होत आहेत त्या प्रमाणे पतसंस्थांनी नविन बदल स्विकारण्यास सज्ज असावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशिल पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची सभा संपन्न झाली.सभासदांना १३ टक्के लाभांष देण्याचा निर्णय या सभेत झाला.
ॲड.धैर्यशिल पाटील म्हणाले, ‘संस्थांच्या वाढीसाठी सर्व घटकांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असतो. ठरावीक टप्पा ओलांडल्यावर पतसंस्थेने बदलत्या नवनवीन धोरणांचा अवलंब करावा आणि बदल करण्याची भुमिका स्विकारावी.एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने घालून दिलेला पायंडा असाच पुढे सुरू रहावा.
पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बनसोडे म्हणाले,‘पतसंस्थेने संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना १३ टक्के लाभांष देण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांच्या आणि संस्थेच्या हितासाठी जीवन रक्षक ठेव दुप्पट करण्यात आली आहे.जीवन रक्षक ठेव वाढविल्यामूळे मृत सभासदांच्या वारसांच्यावर कर्जाचा बोजा राहणार नाही तसेच जामिनदार सभासदही सुरक्षीत राहनार आहे.’
पतसंस्थेचे संस्थापक व वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील (आण्णा) यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. संचालक प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन उत्तम शिनगारे यांनी अहवाल वाचन केले. प्रा. मकरंद बडवे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले. सुजय यादव यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले. प्रा. संदिप सानप यांनी दोष दुरुस्ती अहवालाचे वाचन केले. प्रा. शाहू पाटील यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. सौ. सुनीता पाटील यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. यशवंत जाधव यांनी लेखा परीक्षक नियुक्तीचा ठराव मांडला.
या सभेत सभासद पाल्यांना प्रमाणपत्र, शिल्ड आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. सेवानिवृत्त सभासद व नव्याने झालेल्या शाखाप्रमुख व विशेष प्राविण्यप्राप्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यायाने नॅकची ए ग्रेड मिळविल्याबद्दल व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने बी प्लस प्लस ग्रेड मिळविल्याबद्दल या शाखांचा गौरव करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ. अंकूश बेलवटकर,प्राचार्या सौ. शितल शंतनू पाटील,प्राचार्य संजय पाटील (ठोबळे),प्राचार्य राम शिंदे,प्राचार्य ए. एम. पाटील,मुख्याध्यापक एस.एल.पाटील, मुख्याध्यापक संजय एडके,मुख्याध्यापक कृष्णात भालेकर,मुख्याध्यापिका इरफाना संदे उपस्थित होत्या.प्रा. संदीप सानप यांनी सूत्रसंचालन केले.सचिव सुभाष नांगरे, आदिनाथ झेंडे, नितीन कुटे, अतूल पाटील,सचिन कांबळे यांनी संयोजन केले.सुजय यादव यांनी आभार मानले.