Last Updated on 11 Dec 2021 8:50 AM by Sanjay Patil/Adhorekhit
संप मागे घेण्याचे पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांचे आवाहन
मुंबई |
विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन करीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष, ॲड. अनिल परब यांनी राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला.
परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले, दि. २० डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. विलिनीकरणासंदर्भातील अंतिम अहवाल १२ आठवड्यापर्यंत म्हणजेच सुमारे २० जानेवारी २२ पर्यंत उच्च न्यायालयाला सादर करण्यात येईल. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बाब म्हणून कारवाई करण्यात आली आहे. तथापि, जे कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत त्यांना सकारात्मक वातावरणामध्ये कामावर रूजू करून घेण्यासाठी निलंबनासारखी अप्रिय कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या संधीचा लाभ घेऊन निलंबित कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामिल व्हावे. जेणेकरून संबंधिताना भविष्यात कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असेही मंत्री ॲड. परब यांनी सांगितले.
संपामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना नाहक त्रास होत आहे. त्यांना एसटीची सेवा मिळावी यासाठी आम्ही त्यांना बांधील आहोत. प्रवासी हे आपले ग्राहक आहेत. हा ग्राहक आपल्यापासून तुटू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवून संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले आहे.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित-आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?
वाचकांचा निःपक्ष व निर्भीड आवाज ‘अधोरेखित ‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी ग्रामीण स्तरापासून ते देशविदेशातील ताज्या घडामोडी,महत्त्वाच्या बातम्या,बातमीमागची बातमी, ब्रेकिंग न्यूज वाचकांपर्यंत नि:पक्ष व निर्भीडपणे…!
‘अधोरेखित’ हे facebook Page like 👍 करा
👇👇👇👇
https://www.facebook.com/अधोरेखित-104451631278927/









































































