Last Updated on 22 Dec 2021 4:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रश्न.क्र.५ घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये कोणते निकष विचारात घ्यावेत.
मागील प्रश्नांत चर्चा केल्याप्रमाणे, आकार,उतार ,वाढ, कट या गोष्टी पाहणं आवश्यक आहेच.पण, त्याच बरोबर,वास्तुशास्त्राच्या अनेक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये फारच छान विचार मांडले आहेत.
वास्तुशास्त्राच्या मयमतम अद्याय३ मध्ये भूमी निकष बाह्य लक्षणाचे वर्णन आले आहे.

१)
ब्राह्मणांसाठी
-चौरस अथवा आयताकृती,पांढरा रंगाची भूमी निवडावी.
क्षत्रियांसाठी- आयाताकृती,१/८अधिक लांब,तांबड्या रंगाची,
वैशासाठी
आयाताकृती,१/६अधिक लांब,पिवळ्या रंगाची.
शूद्रांसाठी
आयाताकृती,२/४अधिक लांब ,काळ्या रंगाची भूमी निवडावी.
ब्राह्मणांसाठी दक्षिणेला औदुंबर, पश्चिमेला पिंपळ क्षत्रियासाठी, वैशासाठी उत्तरेला प्लक्ष आणि पूर्वेला वट शूद्रांसाठी अशी जागा निवडावी.
भूमीचा चढ पश्चिम आणि दक्षिणेकडे असावा.
येथे ब्राह्मण,क्षत्रिय ,वैश्य,शूद्र याचा अर्थ चातुर्वर्ण्य पध्दतीनुसार,
गुणकर्मविभागशः असा घ्यावा.जातीशी अर्थाअर्थी याचा काहीही संबंध नाही.
आत्ताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास ब्राह्मण म्हणजे बौद्धिक क्षेत्रात काम करणारे उदा.ज्ञानदान करणारे,अध्यापक, शिक्षक,
क्षत्रिय म्हणजे धाडस,शौर्य ताकदीचे काम करणारे
उदा. पाेलिस,मिलीटरीमधे काम करणारे
वैश्य म्हणजे उत्तम व्यापार करणारे
आणि शूद्र म्हणजे सेवा व्यवसाय संबधित.
२)निवडलेल्या भूमीत एक हात खड्डा खणावा .त्या खड्ड्या मध्ये पाणी भरावे.नंतर शंभर पावले चालून परत यावे,तेव्हा खड्डयातील पाणी स्थिर राहिल्यास अतिउत्तम भूमी असल्याचे समजावे.
पाणी लगेचच जमिनीत मुरत असल्यास ती भूमी कनिष्ठ समजावी.
३)निवडलेली भूमी नांगरून त्या भूमीत शल्य शोधन करावे.शल्य असेल तर काढून टाकावे.किमान एक पुरुष खोलीपर्यंत शल्य कुठेही राहणार नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
अग्निपुराणात उल्लेख आहे,
पुरुषाध:स्थितं शल्य न गृहे दोषदं भवेत्॥३०॥
एक पुरुष खोलीच्या खाली शल्य असल्यास त्याचा दोष मानण्याचे कारण नाही.
४) पुन्माग,जस्मीन,कमळ धान्य सुगंध युक्त दर्प हवेची झुळूक अनुभवता येते,ती भूमी सर्व कार्यासाठी श्रेष्ठ समजावी.
५) ज्या जागेत बी पेरल्यानंतर निंब, निर्गुंडी, पिंडीत, तप्त पर्पिका, बिल्व,सहकाध ही सहा प्रकारची झाडे ज्या भूमीत लवकर रुजतात, उगवतात,ती उत्तम प्रकारची समजावी.
६) ज्या भूमीस स्पर्श केल्यास मृदु लागते,ती एकसारख्या रंगाची असते,त्याचबरोबर चवदार पाणी वाहते, सभोवतालचा परिसर आल्हादायक वाटतो.ती भूमी उत्तम लक्षणी समजावी.
७) वारूळ,दगड ,गोटे,कोळसा राखमिश्रितमाती,शंख, तीक्ष्ण दगड कोंडा,अशी भूमी तसेच लोणी कढवल्यासारखा ,रक्त सांडल्याचा वास ,दुर्गंधी ज्या मातीत येतो ती भूमी सर्वत्र वर्ज्य करावी.
८) सार्वजनिक ठिकाण ,देवालया जवळ, काटेरी झाड,कासवासारख्या आकारा प्रमाणे मधला भाग फुगीर अशी जमीन वर्ज्य करावी.
९) अनेक रस्ते सभोवती असलेली,
विथी शूल ,देवमूर्तीचा वेद स्मशानभूमीजवळ असलेली जागा, मधला भाग खोलगट असलेली जागा, मोठी झाडे ,वेड्यावाकड्या आकाराची भूमी वास्तूसाठी वर्ज्य करावी.
१०) वराहमिहिर बृहत् संहिता ग्रंथात (५३,९२-९३) मधे सांगतात,
एक हात लांब व रुंद खोल खड्डा खणून, काढलेली माती त्यात भरावी हे करताना जर खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती शिल्लक राहिली तर ती भूमी उत्तम समजावी.
११) मनुष्यल चंद्रिकेमध्ये नीलकंठ मूषक, असे म्हणतात की, विष्णूच्या मंदिराच्या मागील बाजूस व डावीकडे तसेच कालिका ,नृसिंह शिव व अन्य उग्र देवतांच्या मंदिरासमोर व उजव्या बाजूस घर बांधले असता अनर्थकारी असते. त्याचप्रमाणे मंदिरापेक्षा घराची उंची जास्त असू नये.मंदिरासमोर व डावीकडे गृहनिर्माण मंदिराश्रित उदा. साधू ,वैष्णव ,शैव, संन्याशी ,पुजारी इत्यादी यांचे निवासस्थान ,अनिष्ठ स्थान व दिशा सोडून घर बांधावे.
१२) मानसारम्अध्याय-४ नुसार पांढऱ्या, मुंग्या ,उंदीर ,कवटी व हाडे शंख वाळू छिद्र इत्यादींपासून मुक्त तसेच कासवाच्या पाठी प्रमाणे फुगीर ,वर्तुळाकार, त्रिकोणी वज्राकार, कार लोहाराच्या भट्टीतील धुराप्रमाणे धुरकटलेली,आणि जिथे चार रस्ते ,तीन रस्ते, दोन रस्ते येऊन
मिळतातअशी जागा सर्वथा वर्ज्य करावी
१३) मत्स्य पुरण अ.२५३ प्रमाणे
जी भूमी उत्तम उपजावू असेल, स्पर्श केल्यास स्निग्घ जाणवेल ती प्रशस्त समजावी. जागा नांगरून पेरणी केल्यानंतर,तीन रात्रीत रोप उगवल्यास उत्तम भूमी समजावी, पाच रात्री तुरळक उगवल्यास मध्यम, आणि सात रात्रीच उगवल्यास कनिष्ठ भूमी समजावी.
१४) समरांगणसूत्रधार अध्याय आठ नुसार खड्डा खणावा उपरोक्त खड्ड्यात पांढऱ्या तांबडय़ा पिवळ्या व काळ्या रंगाची फुले असलेला हार ठेवावा. ज्या रंगांची फुले दीर्घ कालपर्यंत कोमेजणार नाही त्या वर्णाशी संबंधित म्हणजे पांढरी ब्राह्मण ,तांबडी क्षत्रिय पिवळी वैश्य, आणि काळी शूद्र वर्ण यासाठी भूमी प्रशस्त समजावी.
किंवा त्याच खड्ड्यातील पूर्व इत्यादी चारही दिशांना तेल वात तेवत ठेवावी ज्या दिशेची तेल वा दीर्घकाळ तेवत राहील त्या दिशेची संबंधित म्हणजे ,उत्तर ब्राह्मणांसाठी, पूर्व क्षत्रिय यासाठी, दक्षिण वैशांसाठी आणि पश्चिम शूद्रांसाठी शुभ समजावी.
क्रमश:
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?
हेही वाचा…
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !












































































