Last Updated on 21 Jan 2022 4:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार;वाचा कुणाचा सामना कुणाशी रंगणार
![]()
मुंबई ।
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी घोषित केले आहे.ही स्पर्धा ऑस्ट्रेलियातील ७ शहरांमध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.साखळी सामने दोन फेरीत पार पडणार आहेत.आधी पहिली फेरी होईल आणि नंतर सुपर १२ फेरी पार पडेल. त्यानंतर बाद फेरीचे सामने होणार आहेत.टीम इंडिया विश्वचषकातील आपल्या अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करेल. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे.
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ टी२० विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सुपर १२ फेरीमध्ये लढत झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताला १० विकेट्सने पराभूत केले होते. तेव्हा पाकिस्तानने भारतावर विश्वचषकात पहिल्यांदाच विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. आता या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भारत २३ ऑक्टोबरला करेल.
या स्पर्धेत ॲडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या 7 वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. 2014 चा चॅम्पियन श्रीलंका 16 ऑक्टोबर रोजी नामिबिया विरुद्ध स्पर्धेचा पहिला सामना खेळेल.
विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबरला सिडनीमध्ये आणि दुसरा १० नोव्हेंबरला ॲडलेड ओव्हलमध्ये खेळवला जाईल. ॲडलेड ओव्हलवर पहिल्यांदाच विश्वचषकाची उपांत्य फेरी होणार आहे. तर अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा सामना फ्लडलाइट्समध्ये खेळवला जाईल.

या तारखांना होतील टीम इंडियाचे सामने
– भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)
– भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 ऑक्टोबर (सिडनी)
– भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)
– भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर (एडिलेड)
– भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, 6 नोव्हेंबर (मेलबर्न)
बाद फेरी –
९ नोव्हेंबर – पहिला उपांत्य सामना, सिडनी
१० नोव्हेंबर – दुसरा उपांत्य सामना, ऍडलेड
१३ नोव्हेंबर – अंतिम सामना, मेलबर्न
अशी असेल स्पर्धेची रुपरेषा
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत टी२० क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी केली आहे. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर
हेही वाचा…
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
वास्तू शास्त्र । वास्तुशास्त्रात आय,व्ययाचा विचार कशासाठी केला जातो.? त्याचे गणिती सूत्र काय ?
नवी मुंबई | 4 फुटबॉल पिचेस, 40 हजार प्रेक्षक क्षमतेचे FIFA दर्जाचे स्टेडिअम
आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’ । अशी असेल योजना












































































