Last Updated on 16 Jan 2022 4:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मागील प्रश्नात वास्तु,आकार,प्लव,वाढ ,कट,परीक्षण,भूमीशुद्धी,भूमी अधिग्रहण या संदर्भात समजले.
माझा आता असा प्रश्न आहे कि,
प्रश्न क्र.८
वास्तुशास्त्रात आय,व्ययाचा विचार कशासाठी केला जातो.? त्याचे गणिती सूत्र काय ?
उत्तर
आपला प्लॉट/घर लाभप्रद आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आय व्ययाचा विचार वास्तुशास्त्रात केला जातो.
अर्थात आय म्हणजे लाभप्रद आणि व्यय म्हणजे हानिप्रद.
आयव्ययादी षड्वर्ग साधन बल इ. संदर्भात विचार करता,वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळे विचार मांडलेले अाढळतात.
मानसार आणि मयमतम या ग्रंथात मात्र बऱ्यापकी एक वाक्यता दिसते.
राम दैवज्ञ कृत-मुहूर्तचिंतामणी,विश्वकर्मा प्रकाश ,बृहत्संहिता इत्यादी ग्रंथामध्ये तर क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदीच्या आधाराने मापे घेऊन अयादि विचार मांडले आहेत.
मानसार ग्रंथात, अध्याय ९ मध्ये ज्ञग्रंथकर्ते म्हणतात,
वसुभिर्गुणितं भानुर्हान्यायमष्ट शिष्टकम।
नवभिवर्धयेत्पङ्क्त्या हथवा शेषं व्ययो भवेत ॥
आयं सर्वहरं पूण्यं व्ययं सर्वगतेन हि।
आयाधिक्यं व्ययं हिनं सर्वसम्पत्करं तथा॥
आयहिनं व्ययाधिक्यं सर्वदोषकरं भवेत्।
वास्तुची लांबी गुुणिले ८ भागिले १२ बरोबर बाकी राहणारी संख्या म्हणजे आय होय.
वास्तुची रुंदी गुणिले ९भागिले१० बरोबर बाकी राहणारी संख्या म्हणजे व्यय.
वरिल गणिताने आलेली आय व्यय संख्या समान असेल तर ती जागा सर्वोत्तम समजावी.
तसेच आय हे व्ययापेक्षा अधिक आहे ,अशी जागासुद्धा शुभ समजावी
पण जिथे व्यय हे आय पेक्षा अधिक आहे ,अशी जागा मात्र अशुभ जाणावी.
आपली वास्तु शुभाशुभ पाहण्यासाठी आयव्ययाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आय कमी आणि व्यय जास्त असल्यास अशी भूमी,त्या भूमीचा प्रभाव विपरीत असल्याचे दर्शवते.ज्या भूमीचा आय जास्त व व्यय कमी असल्यास काही विद्वान उत्तम असल्याची मान्यता देतात.
परंतु ,अग्नी पुराणात म्हटले आहे,
त्रिशालं वा द्विशामं वा एकशालंम पिंवा।
व्ययाधिकं न कुर्वंती षव्यय दोष करं हितत् । आयाधिकं भवत्पीडा ततकुर्थात्सम द्वयम्॥
(अग्निपुराण अध्याय ६५ ,श्लोक ५,६)
आयचे आधिक्य देखील विषम गुणधर्म मानतात.
ज्या भूमीचा आय आणि व्यय समान आहे,त्या वास्तुची स्थिती सर्वोत्तम समजावी.
साधे उदा. घ्यायचे म्हटले तर आपण जे भोजन नित्य घेतो त्याचे पचन होऊन विसर्जन होणे आवश्यक आहे.
म्हणजे ते पोटात तसेच राहून त्याचे विसर्जन झाले नाही ,तर ते उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जात नाही .त्या प्रमाणे,
आय व्यय समान असणे हे सर्वात उत्तम अग्निपुरात सांगितले आहे.
आय व्यय हे किती हाताच्या आणि कोणत्या घरला पहायचे यासाठी मुहूर्त मार्तंड ग्रंथात ग्रंथकार , नारायण दैवज्ञ सांगतात,
द्वात्रिशाधिकहस्तमब्धिदनं तार्णं त्वलिंदादिकं।
नैष्वायादिकमीरितं तृणगृहं सर्वेषु मासूफितम्ं॥ (मु.मा १९)
बत्तीस हातापेक्षा लांब चार दिशेला द्वारे असलेले गवती असे घर व तंबू इत्यादिकांना आय व्यय पाहण्याचे कारण नाही.
आयव्यय काढण्यासाठी जी मापे घेतली जातात,ती मोज मापे मोज पट्टी अथवा मीटर पट्टीने घ्यायची नसून, त्या साठी स्वामी हस्त प्रमाण म्हणजे ,त्या जागेचा मालक ,मालकीण अथवा ज्येष्ठ पुत्र यांच्या हाताचे माप अर्थात हाताच्या कोपरा पासून अनामिकेचे टोक किंवा मध्यमेचे टोक येथ पर्यंतचे माप,
(सर्व साधारण सव्वा ते दीड फूट.) घ्यायचे असते असे शास्त्र आहे.
मागील प्रश्नात वास्तु,आकार,प्लव,वाढ ,कट,परीक्षण ,भूमीशुद्धी,भूमी अधिग्रहण ,आय व्यय या संदर्भात समजले. माझा आता असा प्रश्न आहे कि,
प्रश्न.क्र.९
घर बांधत असताना मुहूर्ताचे महत्व काय? कोणकोणते मुहूर्त पाहावे?
उत्तर
वास्तुशास्त्राच्या अपराजितपृच्छा ग्रंथात ग्रंथकर्ते म्हणतात,
शुभेषु प्रस्थिते सिद्धिर्वि: स्यान्ममहोत्सव:
अशुभेषु निवर्तेत न गच्छेत् पदमग्रत:
शुभमुहूर्तावर कार्यास आरंभ केल्यावर सिद्धी,विजय प्राप्त होतो, परंतु या उलट अशुभ मुहूर्तावर एक पाऊलसुद्धा पुढे जाऊ नये.इतकं मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मुहूर्त
गृहारंभास मास तिथी नक्षत्रे
श्रेष्ठ महिने
वैशाख ,फाल्गुन पाैष,श्रावण, मार्गशीर्ष .
नारद मते
जेष्ठ ,कार्तिक व माघ हे शुभ आहेत.
अशुभ तिथीवर चतुर्दशी, षष्ठी ,चतुर्थी ,
अष्टमी ,अमावस्या आणि नवमी या तिथि वर्ज्य करून,अन्य तिथींना व रवी आणि मंगळ हे वार व वर्ज्य करून ,अन्य वारी गृहारंभ करावा.
शुभ नक्षत्रे
पुष्य, मृग ,अनुराधा ,धनिष्ठा, शततारका तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, रोहिणी आणि रेवती हीं नक्षत्रे गृहारंभास शुभ होत.
अशुभ योग
वैधृती ,व्यतिपात ,दग्ध, यमघंटयोग मृत्युयोग, इत्यादी वर्ज्य करून चंद्रबल असेल तो दिवस गृहारंभास घ्यावा.
भूमिपूजन पाया खुदाईसाठी श्रेष्ठ नक्षत्रे
अधोमुख नक्षत्रावर म्हणजे भरणी,कृतिका, आश्लेषा, मघा, तिन्ही पूर्वा, विशाखा आणि मूळ या नक्षत्रावर इतर दृष्टीयोग वर्ज्य करून घराचा पाया खणावा.
पायाभरणीसाठी वार व श्रेष्ठ नक्षत्रे
शुभवारी शुभ तिथींना ऊर्ध्वमुख नक्षत्रे
म्हणजे आर्द्रा, पुष्य ,श्रवण, तिन्ही उत्तरा, धनिष्ठा, शततारका आणि रोहिणी ही नक्षत्रे पायाची पहिली कोनशिला/ कॉलम बसवण्यात शुभ होत.
प्रवेशद्वार आणि खिडक्या बसवण्यासाठी
पुनर्वसु, हस्त, अश्विनी,मृग ,अनुराधा, रेवती व स्वाती ही नक्षत्रे घराची दारे व खिडक्या करणे प्रशस्त होतं आणि
अश्विनी ,तिन्ही उत्तरा हस्त पुष्य, श्रवण , रोहीणी स्वाती व रेवती ह्या नक्षत्रे शुभवारी स्थिर लग्नी प्रथम मुख्य प्रवेशद्वाराची दाराची चौकट बसवावी.
स्लॅब/आडें घालण्यासाठी
सूर्य नक्षत्रापासून दिवस नक्षत्रा नक्षत्रे मोजावे. त्यात पहिली तीन नक्षत्रे अशुभ, पुढील तेरा शुभ ,पुढील आठ अशुभ व शेवटचे तीन शुभ. या प्रमाणे मोजून त्यामध्ये शुभ फलात्मक नक्षत्र असेल त्या दिवशी गृहप्रवेश युक्त नक्षत्र पाहून स्लॅब टाकावा किंवा आडें घालावे.
वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा मुहूर्त
नक्षत्रे
तिन्ही उत्तरा ,रोहिणी ,हस्त धनिष्ठा, शततारका पुनर्वसू मघा स्वाती, अश्विनी, रेवती ,श्रवण, अनुराधा ,पुष्य, चित्रा व मूळ हे नक्षत्रे वास्तुशांतीस किंवा इतर कोणत्याही शांतीसाठी शुभ होत.
श्रेष्ठ महिने
तसेच माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे उत्तरायणातील महिने नव्या घरात प्रवेश करण्यास शुभ होत.आणि नवीन बांधलेल्या व जुन्या घरात जाण्यास श्रावण मार्गशीर्ष व कार्तिक हे महिने शुभ होत.
वर्ज्य मास ,वार, तिथी योग इ.
चैत्र मास ,मंगळ व रविवार, रिक्ता तिथी ,दग्ध व मृत्युयोग ,अमावास्या ,दुष्टचक्र जन्मस्थ चंद्र व जन्म लग्न हे योग नव्या घरात जाण्यास फारच वाईट आहेत.
तसेच चर म्हणजे मेष, कर्क ,तुळ व मकर ही लग्ने व ह्यांचे नवमांश गृह प्रवेशास अशुभ होत.
गृहप्रवेश ज्या लग्नी करावयाचा त्या लग्नापासून शुभग्रह केंद्रात त्रिकोणात किंवा दोन अकरा या स्थानी असावे .तीन, सहा ,अकरा या स्थानी पापग्रह असावे व चार आठ बारा या स्थानी एकही ग्रह नसावा .
गृह गृहप्रवेश दिवसा करणे शुभ होय. म्हणून रात्री नव्या घरात जाऊ नये.दिवसा मुहूर्त नसता अडचणीच्या प्रसंगी मात्र रात्री सुमुहूर्तावर गृहप्रवेश करावा.
जुन्या घरात प्रवेश करण्यास सिंहस्थ किंवा गुरु शुक्र अस्त इत्यादिकांचा दोष नाही. पंचांग शुद्धी मात्र असावी(ज्योतिर्मयुख)
गृहारंभ आणि गृहप्रवेशासाठी वृष वास्तू चक्र
सूर्य ज्या नक्षत्रात आहे ,त्या नक्षत्रापासून चंद्रनक्षत्र चार ,पाच ,सहा, सात, पंधरा ,सोळा ,सतरा ,अठरा अथवा तेवीस ,चोवीस पंचवीस, सव्वीस सत्तावीस सव्वा आल्यास अशुभ समजावे.
वरील मुहूर्तानुसार घर बांधकामासाठी कमीत कमी खालील सहा मुहूर्त तरी पाहणे आवश्यक आहे.
१)भूमी अधिग्रहण-
सुमुहूर्तावर प्लॉटचा ताबा घेऊन तेथील जीवजंतू प्राणी पक्षी यांना दुसरीकडे निवारा शोधण्यासाठी प्रार्थना.

(पंचागाधार- दाते पंचांग सोलापूर)
२)भूमिपूजन पाया खुदाई
वरती सांगितल्याप्रमाणे अधोमुखी नक्षत्रावर श्रीगणेश ,दुर्गा देवीची पूजा करून क्षेत्रपाल व अग्नी दिग्पालांची फूल व धूप बली अर्पण करून पूजा करुन भूमिपूजन करावे .
३)पायाभरणी
वर सांगितल्याप्रमाणे अधोमुखी नक्षत्रावर पायाभरणी करावी.
निक्षेप वस्तू-
तांब्याच्या पात्रात माती, वीट ,सोने,पंचरत्न, सप्तधान्य,शेवाळे इ. ठेवून खणलेल्या पायात व्यवस्थित ठेवून कॅालम उभा करावा/किंवा भिंत रचावी.
४)दारे, चौकटी
वरील सांगितलेले नक्षत्र विचारात घेऊन दरवाजे व चौकट बसवावी.
५)स्लॅब(आडे)
मुहूर्तावर प्रथम आरंभ स्लॅब टाकणे किंवा आडे बसविण्यास सुरुवात करावी.
६)गृहप्रवेश /वास्तुशांती मुहुर्त
मंगल वाद्यात मंगल कलश घेऊन सपत्नीक गृहप्रवेश करावा.
क्रमश:
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?
वास्तु शास्त्र । बांधकामांसाठी जमीन ताब्यात घेण्यापूर्वी कोणता विधी करावा ?












































































