Last Updated on 20 Jan 2022 10:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागरिकांच्या कामासह प्रशासकीय कामावर परिणाम : नायब तहसीलदारपदी पदोन्नतीसाठी १८ जण प्रतीक्षेत
सांगली ।
सांगली जिल्ह्यात निवासी निवडणूक,संजय गांधी निराधार योजना व महसूल नायब तहसीलदार अशी २२ नायब तहसीलदार पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे नागरिकांच्या कामासह प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे भरणार कधी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नायब तहसीलदार पदासाठी पात्र असलेले जिल्ह्यातील १८ मंडल अधिकारी व अब्बल कारकून पदोन्नतीपासून अद्याप वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त पदे भरुन पात्र असलेल्यांना पदोन्नती द्यावी,अशी मागणी होताना दिसत आहे. वाळवा तहसील कार्यालयात २ नायब तहसीलदार पदे रिक्त आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रांताधिकारी कार्यालये व तहसीलदार कार्यालये या ठिकाणी एकूण ५२ नायब तहसीलदार पदे मंजूर आहेत.यातील ३० पदे कार्यरत असून २२ पदे रिक्त आहेत.याचा परिणाम नागरिकांच्या कार्यालय कामाच्या गैरसोयीसह प्रशासकीय पातळीवरील विलंबाबतही होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात रजा राखीव नायब तहसीलदार १,निवडणूक नायब तहसीलदार १,विटा व जत प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार हे पद रिक्त आहे. मिरज तहसील कार्यालयात गोदाम व्यवस्थापक हे पद रिक्त आहे. जत तहसील कार्यालयातील सर्वच्या सर्व ४ नायब तहसीलदार पदे रिक्त आहेत. यामध्ये निवासी,महसूल,निवडणूक व संजय गांधी निराधार योजना ही पदे रिक्त आहेत. कवठेमहांकाळमध्येही तीच अवस्था दिसून येते.निवासी,महसूल व निवडणूक नायब तहसीलदार ही पदे रिक्त आहेत.
तासगाव तहसील कार्यालयात संजय गांधी व महसूल नायब तहसीलदार ही २ पदे रिक्त आहेत. विटा तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार हे पद रिक्त आहे. आटपाडी तहसील कार्यालयात महसूल व निवडणूक नायब तहसीलदार हि २ पदे रिक्त आहेत. कडेगाव तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार हे पद रिक्त आहे. पलूसमध्ये निवडणूक नायब तहसीलदार व शिराळा मध्ये संजय गांधी योजना नायब तहसीलदार हे पद रिक्त आहे.
जिल्ह्यात नायब तहसीलदार पदासाठी पात्र असलेले जिल्ह्यातील १८ मंडल अधिकारी व अब्बल कारकून पदोन्नतीपासून अद्याप वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त पदे भरुन पात्र असलेल्यांना पदोन्नती द्यावी,अशी मागणी होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची संख्या
तालुका एकूण मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
विटा ३ २ १
मिरज ५ ४ १
वाळवा ४ २ २
जत ४ ० ४
कडेगाव ३ २ १
कवठेमहांकाळ ३ ० ३
तासगाव ४ २ २
पलूस ३ २ १
शिराळा ४ ३ १
आष्टा १ १ ०
सांगली १ १ ०
आटपाडी ३ १ २
जिल्हाधिकारी कार्यालय ९ ७ २
सर्व प्रांत कार्यालये ५ ३ २
एकूण ५२ ३० २२
हेही वाचा…
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
वास्तू शास्त्र । वास्तुशास्त्रात आय,व्ययाचा विचार कशासाठी केला जातो.? त्याचे गणिती सूत्र काय ?
नवी मुंबई | 4 फुटबॉल पिचेस, 40 हजार प्रेक्षक क्षमतेचे FIFA दर्जाचे स्टेडिअम
आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’ । अशी असेल योजना












































































