थोडक्यात पण महत्वाचे…!
- वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द
- जनतेस माफक दरात वाळू : वाळू उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण
- वाळू उत्खननाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढणार
- हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायाकरिता परवाने देण्याचा समावेश
मुंबई |
राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय दि. 03/09/2019 व दि. 21/05/2015 अशा या दोन शासन निर्णयांद्वारे धोरण निश्चित करण्यात आले होते. हे धोरण रद्द करण्यात आले आहे.
जनतेस माफक दरात वाळू मिळावी म्हणून हातची किंमत स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दराने करण्यास, वाळू उत्खननाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढविण्यास आणि यशस्वी लिलावधारकास हेतूपत्र मिळाल्यानंतर पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यास त्याचप्रमाणे खाडीपात्रात हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायाकरिता स्वामित्वधनाच्या दराने परवाने देण्याचा समावेश करून हे एकत्रित सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा…
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
वास्तू शास्त्र । वास्तुशास्त्रात आय,व्ययाचा विचार कशासाठी केला जातो.? त्याचे गणिती सूत्र काय ?
नवी मुंबई | 4 फुटबॉल पिचेस, 40 हजार प्रेक्षक क्षमतेचे FIFA दर्जाचे स्टेडिअम
आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’ । अशी असेल योजना