Last Updated on 05 Nov 2023 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
✪ राज्यात आतापर्यंत ५३६.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन
✪ कोल्हापूर विभाग आघाडीवर,आतापर्यंत १३०.९४ लाख टन उसाचे गाळप
✪ राज्यातील साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ७ लाख ६९ हजार ८०० मेट्रिक टन
✪ २०२१-२२ हंगामामध्ये १९० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले
✪ नागपूर विभागाचा साखर उतारा ८.३५ टक्के,अवघे २.०२ लाख टन उसाचे गाळप

पुणे ।
राज्यात आतापर्यंत ५४७.०९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.तर ५३६.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा ९.८१ टक्के आहे.तर राज्यात आतापर्यंत कोल्हापूर विभाग आघाडीवर असून आतापर्यंत १३०.९४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.राज्यातील साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ७ लाख ६९ हजार ८०० मेट्रिक टन इतकी आहे.
राज्यात ९ जानेवारीच्या ऊस गाळप अहवालानुसार २०२१-२२ हंगामामध्ये १९० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.यामध्ये ९५ सहकारी तर ९५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.राज्याचा साखर उतारा ९.८१ टक्के इतका आहे.तर कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक ११.१५ टक्के इतका आहे.राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे.कोल्हापूर विभागात १३०.९४ लाख टन उसाचे गाळप झाले असून १४५.९६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.तर सर्वात कमी साखर उत्पादन नागपूर विभागात झाले असून २.०६ लाख टन गाळप झाले आहे.

पुणे विभागाचा साखर उतारा १०.०१ टक्के इतका आहे.या विभागात ११२.११ लाख टन उसाचे गाळप झाले असून ११२.१९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.सोलापूर विभागाचा साखर उतारा ८.८८ टक्के इतका आहे.या विभागात १३०.५६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ११५.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.अहमदनगर विभागाचा साखर उतारा ९.३१ टक्के इतका आहे.या विभागात ७३.८१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ६८.७० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
औरंगाबाद विभागाचा साखर उतारा ९.१९ टक्के इतका आहे.या विभागात ४२.५४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ३९.११ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.नांदेड विभागाचा साखर उतारा ९.७७ टक्के इतका आहे.या विभागात ५१.१४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ४९.९५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.अमरावती विभागाचा साखर उतारा ८.५८ टक्के इतका आहे.या विभागात ३.९३ लाख टन उसाचे गाळप झाले असून ३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.नागपूर विभागाचा साखर उतारा ८.३५ टक्के इतका आहे.या विभागात २.०२ लाख टन उसाचे गाळप झाले असून १.७२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
विभागनिहाय सुरु झालेल्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या अशी :(कंसात खासगी)
कोल्हापूर-२५ (१०),पुणे-१६ (१३),सोलापूर-१६ (२९),अहमदनगर-१७ (९),औरंगाबाद-१२ (११),नांदेड-९ (१७),अमरावती-० (३),नागपूर-० (३)
हेही वाचा…
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !










































































