Last Updated on 12 Dec 2021 7:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
साखरेचा उगम
- प्राचीन काळापासून भारतीय उपखंडात साखरेचे उत्पादन घेतले जाते. सुरुवातीच्या काळात ऊसातला गोड रस मिळवण्यासाठी त्याचे चर्वण केले जात असे. ऊसाचे मूळ स्थान दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया हे होय. नंतरच्या काळात ऊसाच्या विविध जातीही विकसित झाल्या. जसे, भारतामध्ये सच्चारम बर्बेरी तर न्यू गिनी येथे एस इज्यूल आणि एस ऑफीसनेरम. भारतीयांनी ऊसाच्या रसापासून साखर तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढेपर्यंत साखर तुलनेने कमी महत्वाची ठरली. त्यानंतर मात्र साखर हा पदार्थ साठवणूक आणि वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरू लागला. स्फटिकयुक्त साखरेचा शोध 5 व्या शतकात लागला.2010 या वर्षात ब्राझील, भारत, युरोपीयन संघ, चीन आणि थायलंड हे सर्वात जास्त साखर उत्पादक देश होते. 2010 साली ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे सर्वात मोठे निर्यातदार तर युरोपीय संघातील-27 देश, अमेरिका आणि इंडोनेशिया हे सर्वात मोठे आयातदार देश होते. सध्या ब्राझीलमध्ये साखरेच्या सेवनाचे दरडोई प्रमाण सर्वाधिक असून त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि युरोपीय संघामधील 27 देश आहेत.
साखरेचे प्रकार






![]() | स्फटिकयुक्त, पांढरी, अति शुध्द अथवा दैनंदिन वापरातील साखर ही ऊस अथवा बीटपासून तयार केलेली उच्च दर्जाची शुध्दीकृत साखर असते. ही साखर घन अथवा गोळयांच्या स्वरूपात विविध आकार आणि प्रकारांमध्ये उपलब्ध असते. सर्वसाधारणपणे घरांमध्ये ही साखर दैनंदिन वापरात असल्याचे दिसून येते. |
![]() | सुपरफाईन, अल्ट्राफाईन अथवा बार साखर (कॅस्टर साखर) ही अधिक छोटया स्फटिकांची साखर असते, जी चटकन विरघळते. या साखरेच्या स्फटिकांचा आकार इतका सूक्ष्म असतो की केक, चॉकलेट आणि शीतपेयांमध्ये या साखरेचा वापर उपयुक्त ठरतो. |
![]() | फळ शर्करा ,ही आपल्या दैनंदिन वापरातील साखरेपेक्षा थोडी जास्त सूक्ष्म असते, तसेच तिच्या स्फटिकांचा आकार एकसारखा असतो.जिलेटीन,पुडींग आणि शीतपेयांमध्ये वापर करण्याच्या दृष्टीने ही साखर उपयुक्त असते. |
![]() | मिठाईसाठीची अथवा पूड स्वरुपातील साखर(पिठीसाखर) बारीक आणि मुलायम पूड स्वरुपातली ही साखर बारीक दळलेली असते. त्याच्या गाठी तयार होऊ नयेत, यासाठी त्यात काही प्रमाणात स्टार्च मिसळलेले असते. ती विविध आकारातील स्फटिकांमध्ये, सुपरमार्केट सारख्या ठिकाणी सहज उपलब्ध होते. |
![]() | जाडीभरडी साखर याचे खडे नियमीत साखरेपेक्षा मोठे असतात आणि ती साखरेच्या मद्यापासून तयार केली जाते. ही साखर तयार करावयाच्या विशिष्ट प्रक्रियेमुळे त्यातील फ्रुक्टोज आणि ग्लुकोज अत्युच्च तापमानात तग धरून राहतात, त्यामुळे ती मद्यनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरते. |
![]() | तपकिरी/ब्राऊन शुगरही मुलायम स्वरुपाची साखर असून पांढरी साखर आणि मळी यांच्या मिश्रणापासून तयार केली जाते. याचे सार्वत्रिक आढळणारे दोन प्रकार आहेत. फिकट आणि गडद. यापैकी फिक्कट तपकिरी साखर अधिक चवदार असते. |
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
ऊसापासून मिळणारी साखर आणि बीटपासून मिळणारी साखर

ऊसाच्या साखरेमध्ये असणारी विशिष्ट खनिजे बीटपासून तयार होणाऱ्या साखरेतील खनिजांपेक्षा वेगळी असतात आणि त्याचमुळे अनेक तज्ञ बीटपासून तयार होणाऱ्या साखरेपेक्षा ऊसापासून मिळणाऱ्या साखरेच्या वापराला प्राधान्य देतात. ऊसापासून तयार केलेली साखर चटकन विरघळते, गंधमुक्त असते, त्यापासून फेस निर्माण होत नाहीनतसेच बाह्य घटक शोषणाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे घरगुती अथवा दैनंदिन वापरातील अनेक खाद्यपदार्थ तयार करताना,ती अतिशय उपयुक्त ठरते.
साखरेचा उपयोग
स्वादाप्रमाणेच पदार्थ टिकविण्यासाठी म्हणजे परिरक्षक म्हणूनही साखरेचा वापर केला जातो. उदा. मुराम्बा, मोरावळा, इत्यादी. साखरेचा वापर फक्त खाद्यपदार्थातच नाही तर इतर उद्योगांतही केला जातो. साखरेवर रासायनिक प्रक्रिया करून हजारो पदार्थ तयार करतात. प्लास्टिक, औषधनिर्मिती, शीतपेये, सिमेंट, विद्युतविलेपन, गोंद, चर्मोद्योग, स्फोटक पदार्थ, शवसंलेपन, खते अशा अनेक उद्योगांत साखरेचा उपयोग होतो.साखरेचा भारतातील घरगुती दरडोई वापर आजही अन्य उत्पादनांच्या मानाने कमीच आहे. सारे भारतीय घरी वापरतात ती साखर व बिस्किटे, केक्स, आईस्क्रीम, मिठाई, पेढे यांसाठी वापरली जाणारी साखर यात जवळपास दुपटीचा फरक पडतो.
अशी तयार होते साखर

साखर बनवणे दिसायला सोपे.पण प्रत्यक्षात कटकटीचे आहे.कारण व्यापारी तत्वावर साखर बनवायला लागणारी यंत्रसामग्री फार मोठी असते व त्यासाठी भांडवलही भरपुर लागते.या उद्योगाला लागणारा कच्चा माल त्याच प्रमाणात उपलब्ध असणेही महत्वाचे.म्हणजे कारखान्याच्या क्षेत्रातच उसाची पुरेशी लागवड झालेली असणे आवश्यक ठरते. तसेच येथुन उत्पादन होणारा ऊसाचा पुरवठा एकाचवेळी न होता सलग काही महिने होणेही महत्वाचे राहते.साखर तयार करताना ऊस छाटुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे केले जातात. बीट वापरले तर त्यांचे काप केले जावुन पाण्यात भिजवुन मग त्यांचा लगदा बनतो. ऊसाचा रस वा बीटाचा लगदा हा नंतर उकळला जातो.त्यात अन्य रसायने मिसळुन त्याचे ब्लिचिंग केले जाते. त्याच वेळी तपकिरी काळपट मळी एका बाजुला व साखरेचा पाक दुसर्या बाजुला काढला जातो. विशिष्ट आकाराच्या जाळीतुन हा पाक गाळला जातानाच वाळतो व साखरेचे दाणे बनतात. यांत्रिक पद्धतीने लगेच पोती भरुन हवाबंद केली जातात. भारत, माॅरिशस, क्युबा हे साखर उत्पादनातील प्रमुख देश आहेत.ब्राझिलचाही नंबर खुपच वर येतो. युरोप व ब्रिटनमध्ये बीटापासुन साखर बनवली जाते.पण बरिचशी साखर आयात करणेच सोयीची मानली जाते.
मळीपासुन अल्कोहोल बनवता येतो. शिवाय काही रसायनेही त्यापासुन बनु शकतात.केवळ मळी जर तशीच नष्ट करायचे ठरवले ते कठीण असते.झपाट्याने बुरशी धरणारा व अत्यंत वाईट वास येणारा असा हा पदार्थ असल्याने त्याची विल्हेवाट लावणे हा अनेक साखर कारखान्यांपुढे मोठाच प्रश्न असतो.पण ही पुरक उत्पादने निर्माण केली तर खुप प्रश्न व नफाही वाढतो.
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
अधोरेखित–आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !










































































