Last Updated on 05 Nov 2023 9:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे.उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा,उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत.10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने आधीच या पाचही राज्यांत वातावरण तापलेले आहे. त्यात देशात करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने या लाटेतच आता रणधुमाळी रंगणार आहे.
रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांना बंदी
रॅली, रोड शो काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. कोणत्याही प्रकारची पदयात्रा काढण्यास परवानगी नाही. सायकल किंवा बाईक रॅली देखील काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. ही बंदी 15 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे.
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत 18 कोटींहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. एकूण दोन लाख पंधरा हजार 368 मतदान केंद्रे असतील. निवडणुका कोरोनाच्या नियमानुसार होतील. यावेळी उमेदवारांना ऑनलाइन मतदान करता येणार आहे.
कोरोना बाधित 80 वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा असेल. निवडणुका कोरोनाच्या नियमानुसार होतील. मतदान केंद्रांमध्ये 16 टक्के वाढ झाली आहे. Know Your Candidate अॅप देखील तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये उमेदवारांची सर्व माहिती असेल.
यूपीमध्ये 90 टक्के लोकांना एक डोस मिळाला आहे. निवडणूक घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. मतदान केंद्र पूर्णपणे सॅनिटाइज केले जातील. मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली. म्हणजेच तासाभराने मतदान होणार आहे.
निवडणुकीत मतदारांचा सर्वांधिक मतदारांचा सहभाग होईल, हा उद्देश आहे. कोरोना काळात निवडणुका निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे. पण सुरक्षेची काळजी घेऊन निवडणुका होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे.गोवा आणि मणिपूरमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा २५ लाख रुपये असेल. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये असेल, असेही त्यांनी सांगितले.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
पहिला टप्पा : 10 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश
दुसरा टप्पा : 14 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा
तिसरा टप्पा : 20 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश
चौथा टप्पा : 23 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश
पाचवा टप्पा : 27 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश, मणिपूर
सहावा टप्पा : 3 मार्च
उत्तर प्रदेश, मणिपूर
सातवा टप्पा : 7 मार्च
उत्तर प्रदेश
निकाल: 10 मार्च
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !












































































