Last Updated on 06 Nov 2026 9:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ऊसाचे वाढे व पाचट जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावे; दुष्काळी परिस्थितीत पशुधन संवर्धनासाठी प्रशासनाचा पुढाकार
सोलापूर । जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने साखर कारखान्यांनी ऊसतोडणी हार्वेस्टर मशीनऐवजी ऊसतोड कामगारांमार्फत (मॅन्युअली) करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिले आहेत.
सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत अत्यंत कमी व खंडित पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वसामान्य शेतीबरोबरच पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत आहे. सर्वसाधारणपणे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊसतोडणी केल्यास उसाचे पाचट व वरील भाग (वाढे) शेतातच नष्ट होतात किंवा त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करता येत नाही. याउलट, ऊसतोड कामगारांमार्फत हाताने ऊसतोडणी केल्यास मोठ्या प्रमाणात हिरवा चारा (ऊसाचे वाढे) व पाचट उपलब्ध होते. हा चारा ग्रामीण भागातील जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्व... Read more
- हार्वेस्टरऐवजी मजुरांमार्फत ऊसतोडणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना निर्देश
- महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!
- दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश जारी
- आयुष्मान आरोग्य मंदिरांतून आता गावोगावी आरोग्यसेवा!
- शिवाजी विद्यापीठात बी.कॉम.च्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
- शिक्षक-पदवीधर निवडणुकीत कसा ठरणार विजयी उमेदवार? जाणून घ्या मतमोजणीची रंजक प्रक्रिया
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना दोन महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यानुसार, कारखान्यांशी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडणी करताना हार्वेस्टर मशीनचा वापर टाळून मजुरांमार्फत मॅन्युअल पद्धतीने ऊसतोडणी करावी. तसेच ऊसतोडणीदरम्यान उपलब्ध होणारा हिरवा चारा (वाढे) स्थानिक शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत कारखान्यांच्या स्तरावरून ऊस विकास अधिकाऱ्यांना व मुकादमांना योग्य त्या सूचना द्याव्यात.
साखर कारखान्यांनी या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकरी व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संवर्धन व संभाव्य चारा टंचाईवर मात करणे ही सर्वांची सामाजिक व प्रशासकीय जबाबदारी असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.









































































