Last Updated on 08 Jan 2022 8:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बिर्याणी शिजवताना दूध वापरा, बिर्याणी बनवताना दूध कसे वापरावे. चिकन मिल्क बिर्याणीसाठी आवश्यक असलेल्या घटकांची यादी तपासा. योग्य मार्गदर्शक तत्त्वासाठी पूर्ण पाककृती वाचा.
साहित्य
अर्धा किलो चिकन ताजे, अर्धा किलो बासमती तांदूळ तिनं मध्यम आकाराचे कांदे अर्धा इंच आले, पाच पाकळ्या लसून, तीन टोमाटो, अर्धा किलो दही पाणी काढलेले, एक चमचा जिरे, तीन वेलची, एक इंच दालचिनी तुकडा, पाच लवंगा पाच, मिरीचे दाणे, तीन काजू, एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पावडर, अर्धा लिटर ताज क्रीम दुध, एक लिटर साधे दुध, थोडे बेदाणे.
कृती
तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घालावे.नंतर निथळून घ्यावे. दोन कांद्याचे उभे काप करावे, व तेलात करपून ध्यावे. आणि एक कांदा आले लसून आणि टोमाटो सर्व बारीक चिरून घ्यावे. आणि दह्यात आले-लसून पेस्ट, तिखट-मीठ घालून सर्व एकत्रित मिसळावे व चिकनच्या तुकड्यांना चोळून मुरण्यासाठी अर्धा तास ठेवावे. नंतर तेल तापवून त्यात जिरे, हिरवी वेलची, दालचिनी, मिरी, लवंगा घालून परतावे नंतर कांद्याचे उभे काप घालून ते लालसर होऊ द्यावे व आले लसून बारीक कापून ते घालावे ते झाल्यावर काजूचे तुकडे घालावे या सर्व मसाल्यात टोमाटो चे तुकडे घालावे व गरज असल्यास थोडे पाणी घालून ढवळावे. नंतर धणेपूड जिरेपूड घालून शिजू द्यावे. मिश्रणाच्या कड्याना तेल सुटे पावेत शिजू द्यावे व नंतर चिकन घालावे. व चांगले ढवळावे व थोडे शिजू द्यावे. दुधात क्रीम, आणि केसरच्या दोन काड्या मिसळून त्या चिकनवर ओताव्या नंतर धुवून पाणी निथळलेले तांदूळ घालून निट ढवळावे व थोडे शिजण्या जोगे पाणी घालून पूर्णपणे शिजू द्यावे. जेवताना वाढताना त्यावर बेदाणे व परतलेला कांदा त्यावर पसरावा.
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !











































































