Last Updated on 16 Jan 2022 10:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही! म्हणूनच तुमच्यासाठी ही ओल्या काजुची खास रेसिपी-
साहित्य
१ १/२ कप ओले काजू (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.), 2 मध्यम कांदे, ४ लसणीच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं, १/४ कप ओलं खोबरं, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ, आवडत असल्यास गूळ किंवा साखर, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग, २ चमचे मोहरी.
कृती
१. ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील.
२. सालं काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत.
३. कांदा बारीक चिरावा. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मिरच्या चिरून घ्याव्यात.
४. कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. मग हळ्द व हिंग घालावे.
५. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देउ नये. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा.
६. मग काजू घालून जेवढी पातळ हवी तेवढे पाणी घालावे. काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे.
७. आता त्यात गरम मसाला, चिंच/कोकमं, मीठ, गूळ घालावा.
८. खोबरं घालून ढवळावे.
९. वर कोथिंबीर पेरून पोळी/भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी.
उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !












































































