Last Updated on 07 Jan 2022 4:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
15-18 वयोगटासाठी कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली नसतानाही काही माध्यमांमधून या लसीला मंजुरी दिल्याचा दावा केला जात असून तो दिशाभूल करणारा आहे. हे वृत्त अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे आणि सत्याची शहानिशा न करता केलेले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्याचा कुठेही उल्लेख नाही. 27 डिसेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वांमध्ये पृष्ठ 4 वरील उप-शीर्षक (e) वर “15-18 वर्षे वयोगटातील नवीन लाभार्थी” या शीर्षकाखाली, म्हटले आहे की “या लाभार्थ्यांसाठी, केवळ कोवॅक्सिन लसीकरणाचा पर्याय उपलब्ध असेल. कोवॅक्सिन ही 15-18 वयोगटासाठी मंजुरी मिळालेली एकमेव लस आहे”.
24 डिसेंबर 2021 रोजी 12-18 वर्षे वयोगटातील कोवॅक्सिन लसीसाठी CDSCO या राष्ट्रीय नियामकाने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर, 15-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आणि इतर सह्व्याधी असलेल्यांसाठी खबरदारी म्हणून मात्रा देण्याबाबत 27 डिसेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ttps://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesforCOVID19VaccinationofChildrenbetween15to18yearsandPrecautionDosetoHCWsFLWs&60populationwithcomorbidities.pdf यावरती उपलब्ध आहेत आणि पाहता येतील.
Guidelines for COVID-19 vaccination of children between 15-18 years
Guidelines for COVID-19 vaccination of children between
साभार : पत्र सूचना कार्यालय,भारत सरकार
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !









































































