सांगली । हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले येथील तीर्थक्षेत्र मल्लिकार्जुन क्षेत्र भाविक व पर्यटकांना भुरळ घालत. आहे. ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेल्या या क्षेत्राचा अलिकडच्या काही वर्षात विकास होवू लागला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे.सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेले हे ठिकाण पश्चिम महाराष्ट्रात पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे.
मल्लिकार्जुन डोंगरावर असलेल्या या तीर्थक्षेत्राचा पुराण ग्रंथात विलासगड असा उल्लेख आहे.१७१७-१८ या साली मोगलांनी शाहूंना दिलेल्या सुभे व किल्ल्यांच्या यादीत विलासगडाचे नाव आहे.१७९८ ला गड पुनर्बांधणीचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे.हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या ताव्यातही असल्याची नोंद आहे.या डोंगरावर अगस्ती ऋषींनी स्थापन केलेल्या मल्लिकार्जुनचे गुहेत पुरातन मंदिर आहे..
कसे जाल…
हे क्षेत्र सांगली,कोल्हापुर,कराड या ठिकाणापासून ४० कि.मी. अंतरावर आहे.येडेनिपाणी गावापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत पक्का डांवरी रस्ता आहे. तर येलूर,मालेवाडी,गोटखिंडी या गावापासून डोंगरावर जाण्यासाठी पाऊलवाटा आहेत.या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्याने येथे भाविकांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सेवा मंडळानेही अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत.पायथ्यापासून मंदिरापर्यंत पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.या क्षेत्राला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव दिल्याचे सरपंच डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.
काय पहाल….
या ठिकाणी पुरातन मल्लिकार्जुन मंदिराशिवाय उमा शंकर,भिमा शंकर,मानकरी पट्टा,सासरवाशिन मुर्ती,स्वयंभू सोमनाथ,नागशिल्प,दीपमान,तुळशी वृंदावन,हेमाडपंथी मंडप, गंगा टाके ही ठिकाणे व मंदिर पाहण्यासाठी आहेत.तर डोंगराच्या टोकावर मुस्लिम समाजाचे वावरदिन दर्गाह व मशिद आहे. तसेच त्याला लागून पुरातन श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर आहेत.याला लागूनच या परिसरातील एकमेव पुरातन विष्णू मंदिर,नगारखाना आहे.शिवाय पाण्याचा तलाव,विस्तीर्ण घोडे मैदान पाहण्यासारखे आहेत.डोंगर टोकावरून दक्षिणेला वारणेचे तर उत्तरेला कृष्णेचे विस्तीर्ण खोरे येथे येणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. डोंगरावरील गर्द झाडी या क्षेत्राचे वैभव आणखी वाढवत आहे.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
वास्तु म्हणजे काय ?
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !