Last Updated on 16 Dec 2021 7:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘महाराष्ट्र फिल्म सेल’ने आपले संकेतस्थळ अधिकाधिक युजर फ्रेंडली करावे
मुंबई |
महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
आज मंत्रालयात फिल्मसिटी संदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, अजय सक्सेना, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये मराठीमध्ये आशयघन चित्रपट आलेले आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हे सिनेमे पाहण्याची संधी प्रेक्षकांना फिल्मसिटीमार्फत उपलब्ध होणार आहे. लोककलावंताचे वार्षिक संमेलन, महाराष्ट्र महोत्सव, मराठी चित्रपट पुरस्कार, लोकोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि फिल्मसिटी पुढाकार घेणार आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे दरवर्षी एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि कलाकार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पुढाकार घ्यावा. याशिवाय राज्यातील वेगवेगळया कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची माहिती एका ठिकाणी मिळावी यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
‘महाराष्ट्र फिल्म सेल’ने आपले संकेतस्थळ अधिकाधिक युजर फ्रेंडली करावे
मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी महाराष्ट्र फिल्म सेलअंतर्गत एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र फिल्म सेलने आपले संकेतस्थळ (http://www.filmcell.maharashtra.gov.in) अधिकाधिक युजर फ्रेंडली करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
श्री.देशमुख म्हणाले की, मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असते. अशा वेळी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. विस्तारीकरण करीत असताना एक खिडकी योजना नेमके काय आहे हे अधिकाधिक लोकांना समजणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र फिल्म सेलने आपले संकेतस्थळ अधिकाधिक युजर फ्रेंडली करताना याबाबतची सोशल मीडियावर प्रसिद्धी करावी.
राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.त्यांच्या चित्रिकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of doing business)चित्रिकरणासाठीच्या आवश्यक असणाऱ्या 30 हून अधिक परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी सात दिवसांच्या आत देण्यात येते. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असून निर्मात्यांना अटी शर्तीचे पालन करुन तसेच चित्रीकरणासाठी शुल्क भरुन परवानगी देण्यात येते.
हेही वाचा…
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा














































































