मराठी ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी 100 तोळे सोने मानधन म्हणून देण्याचा प्रकार घडला असेल काय ? होय ! मराठी ग्रंथ व्यवहारात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला असे घडले आहे. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या मराठी लेखकाने आपल्या अनुवादकाला चक्क 100 तोळे सोने मानधन म्हणून दिले.
वास्तविक डॉ. आ.ह.साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे मराठी ग्रंथ व्यवहारात पुस्तक रखडणे हा नियम तर चालणे हा अपवाद आहे. असंही म्हटलं जातं की लेखक हवेत किल्ला बांधतो, वाचक या किल्ल्यात राहतो आणि प्रकाशक भाडे वसूल करतो. पण कृष्णाजी अर्जुन केळुस्कर (गुरुजी) यांनी बुद्धचरित्र आणि अनेक चरित्रे लिहली. ते साप्ताहिकाचे संपादक होते. मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रिकच्या परीक्षेनंतर बुद्ध चरित्र भेट दिले. सयाजीराव गायकवाड महाराजांचा परिचय करून दिले. केळुस्कर गुरुजी उत्तम वाचक व लेखक होते. सार्वजनिक जीवन उभे रहावे यासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्व परिचित होते.
शिवचरित्रावरील सर्व उपलब्ध साधनांचा वापर करून केळुस्कर गुरुजींनी 1907 ला शिवाजी महाराजांचे मराठी चरित्र प्रकाशित केले. या चरित्रात त्यांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची कल्पना राष्ट्रीय होती हे दाखवून दिले. शिवरायांच्या अष्टपैलू गुणांचा वेध घेतला. मराठी ग्रंथ व्यवहारात पुस्तकाच्या एक हजार प्रती काढण्याची परंपरा मोडून चार हजार प्रती काढल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी एक हजार रुपये दिले. 500 प्रती खरेदी केल्या. बापूसाहेब कागलकर व सयाजीराव महाराज यांनी प्रत्येकी 200 प्रती घेतल्या. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढण्यापूर्वीच केळुस्करांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी अनुवादक शोधायला सुरुवात केली. मूळचे धारवाडचे प्रा. नीळकंठराव ताकाखाव हे मुंबईला विल्सन कॉलेजात इंग्रजी शिकवत. त्यांनी अनुवादाचे काम स्वीकारले. अनुवादाचे प्रुफे तपासणाऱ्या डॉ. मॅकनिकल यांनी इंग्रजी आवृत्तीला प्रस्तावना लिहली. मराठी शिव चरित्राची ही दुसरी आवृत्ती आणि इंग्रजी अनुवादासाठी केळुस्कर गुरुजींना कर्ज काढावे लागले.
शिवरायांचे हे साहित्य विषयक स्मारक पूर्ण करण्यासाठी धडपड्या केळुस्कर गुरुजींनी 200 लोकांची समिती स्थापन केली. चार पाच हजार रुपये फंड जमला. पुस्तकांसाठी सहकार्य करू असा शब्द देणाऱ्या शाहू महाराजांचे निधन झाले होते. मात्र केळुस्कर गुरुजींनी भेट घेतल्यावर इंदूरचे तुकोजीराव होळकर यांनी त्यांना 24000 रुपये दिले. इंग्रजी प्रतीसाठी इतर संस्थानिकांचा प्रतिसाद अत्यल्प होता. दुसऱ्या मराठी आवृत्तीच्या पाच हजार प्रती छापल्या. किंमत 4 रुपये होती. या शिवचरित्राची गुजराती, तामीळ, कानडी भाषेत भाषांतरे झाली. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्याकडे प्रा. ताकाखाव यांनी कधीही मानधनाची मागणी केली नाही. मात्र केळुस्कर गुरुजींनी सर्व खर्च भागल्यावर उरलेल्या पैशातून 100 तोळे सोने खरेदी केली. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांना मुंबईत बोलावून मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या मराठी लेखकाने अनुवादक प्रा. नीळकंठराव ताकाखाव यांना तुकोजीराव होळकर महाराजांच्या हस्ते 100 तोळे सोने मानधन म्हणून दिले. या इंग्रजी आवृत्तीच्या 3500 प्रती परदेशातील ग्रंथालयांना विनामूल्य पाठवल्या.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
हेही वाचा…
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप’चा विळखा होतोय घट्ट
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली