Last Updated on 01 Feb 2022 9:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निसर्ग संपन्नता लाभलेले,कृष्णेच्या कुशीत वसलेले बहे (ता.वाळवा) येथील ‘श्री क्षेत्र रामलिंग बेट’
निसर्गाचं वरदान लाभलेले आणि नदीपात्रात वसलेले राज्यातील हे एकमेव ठिकाण
बहे रामलिंग बेट ‘निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार’
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे याठिकाणी पर्यटन विकासाची अनेक कामे
मराठी चित्रपट,मराठी-हिंदी अल्बम साँग्ज यासोबत मराठी वेब सेरीज यांचे चित्रीकरण
‘प्री वेडींग’ शूटसाठी या लोकेशनला छायाचित्रकारांचा ओढा वाढला
सांगली । टीम अधोरेखित
प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व,निसर्ग संपन्नता लाभलेले,कृष्णेच्या कुशीत वसलेले बहे (ता.वाळवा) येथील ‘श्री क्षेत्र रामलिंग बेट’ मराठी चित्रपट चित्रीकरणासाठी अतिशय रमणीय स्थळ म्हणून पुढे येत आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान लाभलेले आणि नदीपात्रात वसलेले राज्यातील हे बहुधा एकमेव ठिकाण असून या ठिकाणी असंख्य मराठी चित्रपट,वेबसेरीज यांची चित्रीकरणे झाली आहेत. ‘प्री वेडींग’ शूटसाठी या लोकेशनला छायाचित्रकारांचा ओढा वाढला आहे.

बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून १० कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे 7 कि. मी. अंतरावर कृष्णेच्या कुशीत रामलिंग बेट वसलेले आहे.प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती. रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १ कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे.

धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात.रामलिंग बेटाच्या सर्वात उंच अशा मध्यभागी श्री.रामलिंग देवालय असून ते सर्वात पुरातन आहे. प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना जाता- जाता हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिव शंकराची पूजा केली म्हणून यास रामलिंग असे म्हणतात. कृष्णा नदीच्या मध्यभागी वसलेल्या या निसर्गसुंदर स्थळाचा पर्यटन विकास होत आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पर्यटन विकासाची अनेक कामे याठिकाणी झाली आहेत.
रामलिंग तीर्थक्षेत्र बेटातील संथ वाहणारे ‘कृष्णा माईचे’ निळेशार पाणी बोडक्या दगडावरून वाहते.त्यामुळे तरुण-तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे.जुन्या काळातील उंच बांधलेला पूल.त्याच्याखाली काळ्याशार बोडक्या काटेरी दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते.छोट्या बंधाऱ्यावरून चालताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो.पुलावरुन जाताना कृष्णेचे विशाल पात्र डोळ्यात भरते. बाजुचे फ़ेसाळणारे पाणी स्वागत करते,या विश्वात प्रवेश करताना आपल्यालाही मुक्त झाल्याचा भास होतो.

रामलिंग बेट मराठी चित्रपट चित्रीकरणासाठी अतिशय रमणीय स्थळ असून,या परिसराला शूटिंग करण्यासाठी पूरक असे अनेक अँगल आहेत.प्रचंड प्रमाणात वापरले जाणारे चित्रपट साहित्य,खूप लोकांना सहज फिरता येणारा परिसर आणि सर्वात महत्त्वाचे कॅमेरासाठी अनुकूल स्वच्छ वातावरण यामुळे निर्माते,कॅमेरामन,दिग्दर्शक यांचा ओढा बहे रामलिंग बेटाकडे वळला आहे. या भागातील सधन आणि सर्वसामान्य शेतकरी,ग्रामपंचायत,पदाधिकारी हे निर्मात्यांना नेहमीच मदतीच्या भावनेने तत्पर असतात,इतर ठिकाणच्या लोकेशनला आलेले बाजारूस्वरुप,तेथील लोकांकडून अव्वाच्यासव्वा केली जाणारी आर्थिक लूट यामुळे आपसूकच बहे रामलिंग बेट यासाठी श्रेष्ठ ठरू लागले आहे. आतापर्यंत येथे अंटीनं वाजवली घंटी,हुप्पा हुय्या,फिलिंग ढगात यासह काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
वाहतूक,लॉजिंग,जेवण याचा विचार करता इस्लामपूरसह परिसरात अद्यावत सोई झाल्या असून,कमी खर्चात विविध लोकेशन मिळू लागल्याने निर्माते याकडे आकर्षित होताना दिसत आहेत.यामुळे,या परिसरात असंख्य मराठी चित्रपट,मराठी-हिंदी अल्बम साँग्ज या सोबत मराठी वेब सेरीज,नाटकाच्या तालमी यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध आहे.’प्री वेडींग’ शूटसाठी या लोकेशनला छायाचित्रकारांच्या कल असून आपल्याच परिसरात कोकणचा फील येतोय यामुळे पडद्यावरील चित्रीकरण,मनमोहक व आकर्षक ठरत आहेत.
हे वाचा…
निसर्गाचं वरदान : तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत












































































