संत गाडगेबाबांचा कीर्तन कल्लोळ
थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक संत गाडगेबाबांची सोमवारी,२० डिसेंबर रोजी पुण्यतिथी.त्यानिमित्ताने…
कीर्तन या मौखिक परंपरेचा संत गाडगेबाबांनी प्रभावी वापर केला.आचार्य अत्रे यांनी ‘सिंहाला पहावे वनात,हत्तीला पहावे रानात,गाडगेबाबांना पहावे कीर्तनात’ असे म्हटले आहे.लोकांच्या विचार शक्तीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी भजनांचा आधार घेत.’गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या ओळी कीर्तनाच्या ठिकाणी सामूहिक टाळ्यांच्या गजरात वारंवार व्यक्त होत.
कुठल्यातरी दुकानाच्या फळीवर गाडगेबाबांची कीर्तन होणार असा मजकूर असे.परिसरातील लोक गाडगेबाबांच्या कीर्तनासाठी धाव घेत.सामान्य माणसासाठी त्यांनी सोपी,बाळबोध व ओघवती भाषा वापरली.समाजवादाचे व्यासपीठ म्हणून त्यांची रसाळ वाणी गर्जत राहिली.त्यांचे कीर्तन म्हणजे भावना,विनोद आणि विचार यांचे महावस्त्र असे.
भुकेलेल्याला अन्न,उघड्या नागड्याला वस्त्र,बेकराला रोजगार,गरीब मुलांना शिक्षण,अंधू,पंगू,गरीब तरुण,तरुणींचे लग्न,मुक्या प्राण्याला अभय हीच देवपूजा,हाच रोकडा धर्म असे विचार ते मांडत.
‘चोरी करू नये,कर्ज काढून चैन करू नये,दारू पिऊ नये,देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’,अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत.पारंपरिक,पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.
कर्ज काढून यात्रा नको,पशुधनाची काळजी घ्या,देवाला नवस करा,अशी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाना लागू होणारी आचारसंहिता हा त्यांच्या कीर्तनाचा आशय असे.समाज प्रबोधनासाठी ते राज्यभर वार होवून हिंडत राहिले.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली.अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही,संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते,अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली.
त्यांचे खारेपाटणला कीर्तन सुरू असताना त्यांचा मुलगा गोविंद मरण पावल्याची तार आली.तरीही निर्विकार मुद्रेने बाबा म्हणाले,’मेले ऐसे कोट्यानुकोटी,काय रडू एकासाठी,बोला देवकीनंदन गोपाला’.व्यक्तिगत प्रश्नांकडे तटस्थ वृत्तीने पाहणे आणि गाडगेबाबांची प्रबळ जीवन निष्ठा या प्रसंगातून दिसते. त्यांचे चरित्र लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर म्हणतात की,” गाडगे महाराजांनी ग्रामीण महाराष्ट्रात कीर्तन कल्लोळ उठवला.
स्वच्छता,प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे.तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात;परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करीत.खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता.श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.
” शनिवारी, ८ नोव्हेंबर १९५६ ला वांद्रे पोलिस ठाण्यात गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन झाले.कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत तुकडोजी महाराज या महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारधारेचे गाडगेबाबांनी कट्टर समर्थन केले.सॉक्रेटीसप्रमाणे श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे करीत कर्मकांडामधील निरर्थकता त्यांनी अधोरेखित केली.संत गाडेबाबांचे कीर्तन रंगतदार वक्तृत्वाचा कलात्मक आनंद देत असे.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
हेही वाचा…
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप’चा विळखा होतोय घट्ट
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली