Last Updated on 29 Dec 2021 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
10 कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम होणार हस्तांतरित
आतापर्यंत 1.6 लाख कोटीपेक्षा अधिक सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना करण्यात आली हस्तांतरित
तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांची निरंतर कटीबद्धता आणि निर्धाराला अनुसरत हा हप्ता होणार जारी
51 शेतकरी उत्पादन संस्थाना 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान करणार जारी
1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना होणार याचा लाभ
हेही वाचा…
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
नवी दिल्ली |
तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी निरंतर कटीबद्धता आणि निर्धार जारी राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी,प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम –किसान) योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारी 2022 ला दुपारी 12:30 ला दूरदृश्य प्रणालीद्वारे जारी करणार आहेत. यावेळी 10 कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे.
पीएम-किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक 6000/- रुपये देण्यात येतात.लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते. या योजनेत 1.6 लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात सुमारे 351 शेतकरी उत्पादन संस्थाना (एफपीओ)14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान, शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
हेही वाचा…
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे










































































