Last Updated on 09 Dec 2021 6:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शनिवारी दुपारी 12:30 वाजता होणार महाअंतिम सोहळा
सांगली ।
निशिकांत दादा युथ फौंडेशनच्या वतीने उरूण – इस्लामपुर शहरात प्रभाग निहाय खेळ पैठणी चा सन्मान गृह लक्ष्मी चा हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाला शहरातील महिला वर्गाकडुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील महिलांच्या आग्रहास्तव संपुर्ण शहरातील महिलांसाठी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा शनिवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता राजारामबापु नाटयगृहात होणार असल्याची माहीती संयोजकांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसापासुन शहरातील महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा,त्यांचा सन्मान व्हावा यासाठी निशिकांतदादा युथ फौंडेशन आयोजित शहरातील प्रभाग निहाय खेळ पैठणीचा सन्मान गृह लक्ष्मीचा या कार्यक्रमाला शहरातील महिलावर्गातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,सहभागी सर्व महिलांचा सन्मान करण्यात येत असुन पहिल्या तीन महिला विजेत्यांना पैठणी,साडी,डिनरसेट असे बक्षिसे दिली जात आहेत.

शनिवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता राजारामबापु नाटयगृहात या कार्यक्रमाची महाअंतिम फेरी होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्या महिलांच्या कला गुणांना वाव मिळणार आहे,या कार्यक्रमात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमातील प्रथम क्रमांक विजेत्या महिलेस मानाची पैठणी, सोन्याची नथ आणि सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक विजेत्या महिलेस एक ग्रॅम सोन्याचे नाणे,नथ आणि सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक विजेत्या महिलेस ड्रेसिंग टेबल , नथ आणि सन्मानचिन्ह,चतुर्थ क्रमांक विजेत्या महिलेस नॉनस्टिक सेट,नथ आणि सन्मानचिन्ह,पाचवा क्रमांक महिला विजेत्या वॉटर फिल्टर,नथ आणि सन्मानचिन्ह बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहेत,बक्षिस वितरण प्रकाश पब्लिक स्कुल च्या प्रशासिका सुनिता निशिकांत भोसले- पाटील,स्नेहल अक्षय भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रश्मी सावंत व योगिनी चोरडिया करणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन निशिकांत दादा फौंडेशन चे अध्यक्ष अक्षय पाटील,अक्षय कोळेकर,भाजपा शहराध्यक्ष अशोकराव खोत,जिल्हा सरचिटणीस संजय हवालदार,भाजपा संघटन सरचिटणीस प्रविण परीट,भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा स्मिता पवार आदिसह अन्य पदाधिकारी करीत आहेत.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप’चा विळखा होतोय घट्ट














































































