Last Updated on 09 Dec 2021 6:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
साहित्य -संगीत-कला विहिन: । साक्षात्पशु पृच्छविषाणहीन l
तृण न खाद्न्नपि जीवमान: ।
तद्भागधेय परमं पशूंनाम् ।
दीड-दोन वर्षांत’ कोरोनामुळे लॉकडाऊन पडले,त्यामुळे कलाकारांची कला सादरीकरणाची झालेली घुसमट हे ओळखून इस्लामपूर येथील प्रभाकर जंगम यांनी त्यांच्या घरी फक्त कलाकारांना एकत्रित करून सुंदर मैफल आयोजित करून रम्य सुरमय संध्याकाळ सुरांच्या चांदण्यात साजरी केली.
या मैफिलीत सुरांचा आत्मानंद सर्व कलाकारांनी सपत्नीक घेतला.त्यामुळे त्यांच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
या संगीत मेळाव्यात प्रमुख अतिथी संगीत अभ्यासक तबला वादक गायक संतोष अंगापूरकर,सत्कारमूर्ती गुरूवर्य मनोहर जंगम (संगीत शिक्षक ),जेष्ठ संगीतगुरु पं. हणमंतराव जाधव,पंडित लोहार ( संगीतगुरु ),रमेश वाडेकर(प्रसिद्ध तबलजी ) या गुरुजनांचा जंगम कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सदर मैफिलीस कु. मानसी पाटील हिच्या गणेशवंदनाने सुरूवात झाली.संगीत शिक्षक कैलास सावंत,संतोष अंगापूरकर,चि.यशराज शेवाळे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
तर जयकर जाधव ( या जन्मावर… ),सुधीर वागिरे(आनेवाला पल हिंदी गीत),शशांक चव्हाण(देह देहाचे मंदिर),प्रभाकर जंगम यांनी(नवोदित कवी श्रीधर कुलकर्णी यांची रचना स्वत: संगीतबद्ध केलेली,शब्द शब्द रचूनी विणले गीत भावनांचे नविन रचनासादर केली),सैा.मंगल जंगम (भाग्यदालक्ष्मी बारम्मा ),सौ मनीषा पाटील (भाग्य दिले हे तू मला),सौ अनिता ग्रामोपाध्ये (आठवणीचे गीत गाता ),चि.गंधार जाधव (सूर निरागस हो) यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.चि.प्रथमेश जंगम याने स्वत: संगीतबद्ध केलेले गीत गिटार वाजवून रॅपम्युझिक मध्ये गायल्यामुळे तरूणाई प्रफुल्लित झाले झाली.
तबल्याची साथ तबला शिक्षक सतिश पाटील,विनायक वाडेकर चि.केदार चव्हाण,सुरेश वाडेकर यांनी केली.साईड रिदम साथ सुहास वागिरे,देवानंद पाटील यांनी दिली.ध्वनी संयोजन जयकर जाधव यांनी केले.
आभार प्रभाकर जंगम यांनी मानले.आयोजित स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे आयोजन सौ.मंगल जंगम आणि ज्योतिषशास्त्री प्रभाकर जंगम यांनी केले.
प्रा.दशरथ पाटील,डी.बी.पाटील,वसंत आवटे.हंबीरराव पाटील,दत्ता जाधव यांच्यासह रसिकवर्ग उपस्थित होता.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप’चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे










































































