Last Updated on 16 Feb 2025 10:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रश्न क्र.४
मागील प्रश्नांत मला वास्तु म्हणजे काय? आकार व उतार या संबंधित माहिती मिळाली.
प्रश्न – माझा असा प्रश्न आहे,घराची अर्थात भवनाची किंवा वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल का ?
उत्तर
नाही, चालत नाही,कारण,
बृहत्संहिता या ग्रंथात, वास्तुविद्या प्रकरणात वराहमिहिर सांगतात,
प्राग्भवति मित्रवैरं मृत्यूभयं दक्षिणेन यादि वृद्धि:।
अर्थ विनाश: पश्चादुदग्विवृद्धाै मनस्ताप:११७
वास्तुची पूर्वेची वाढ किवा भिंत बाहेर आल्यास मित्रांमध्ये शत्रुत्व निर्माण होते,
दक्षिणेकडील मृत्यक्लेश पिडा,
पश्चिमेकडील धननाश,
उत्तरेकडील मनस्ताप.
अर्थात वाढ करायची असेल तर चारही बाजूंनी वाढ करणे आवश्यक आहे.
कोणत्याही बाजूची वाढ ही अशुभ सांगितली आहे,किंवा अशाप्रकारचा प्लॉट सरळ करुन घेणं आवश्यक आहे.
एखादा प्लॉट एका दिशेला जरी कट असेल अर्थातच तो दुसऱ्या दिशेला वाढलेला असतो.
म्हणजेच वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार आपला आपला प्लॉट चारही बाजूंनी समान असावा.
त्याची वाढ किंवा कट झालेला नसावा.
समराङ्गणसूत्रधार:या ग्रंथात सांगितलेले आहे,
चीयमाना यदा भित्तिर्दक्षिणा स्याद् बहिर्मुखी तदा॥
व्याधिभयं विद्यानृपदण्डभयं तथा॥
दक्षिणेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास व्याधी भय आणि नृपदंड उद्भवतो.
यदा तु पश्चिम कुड्यं प्रायाति बहिरग्रत:।
धनहानिं विजयानीयाच्चौरेभ्यश्च भयं तदा॥
पश्चिमेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास धनहानी आणि चोरांपासून भय.
अशा घरात चोर्या झाल्याचे अनेकवेळा अनुभवास येते.
उत्तरं तु यदा कुड्यं चीयमानं बहिर्व्रजेत।
गृहभर्तुश्च कर्तुश्च व्यसनं स्यात् तदा महत्॥
उत्तरेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास घरमालक आणि आर्किटेक्ट यास व्यसन जडते.
अर्थात मालक-आर्किटेक्ट दोघांनाही दोषदायक आहे.
यदाग्रं चीयमानाया: पूर्वभित्तेर्बहिर्व्रजेत् ।
तदा गृहपतेस्तीर्वं राजदंडभयं भवेत॥
पूर्वेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास गृह पस्तीस तीव्र राजदंड उद्भवतो.
उपदिशेतील वाढीच्या संदर्भातही समरांङ्गणसूत्रधार ग्रंथात उल्लेख आढळतो,
प्राग्दक्षिणो यदा कर्णश्चीयमानो बहिव्रजेत।
तंत्राग्निभीतिरतुला संशयश्च प्रभोर्भवेत् ॥
आग्नेयेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास अग्निभय उद्भवते .
बहिर्मुखो यदा गच्छेत् दक्षिणपश्चिम:।
कलहोपद्रवस्तत्र स्यादभार्यायाश्र्च संशय:
नैर्ऋत्येकडील भिंत बाहेर आलेली असल्यास कलह आणि पत्नी संशय उद्भवतो.
यात्रोत्तरापर: कर्णश्चियमानो व्रजेद् वहि:।
पुत्रवाहनभृत्यानां भवेत् तस्मिन्नुपद्रव:।
वायव्येकडील भिंत बाहेर आलेली असल्यास पुत्र,वाहन,नोकर यांना उपद्रव होतो.
यदा प्रागुत्तर:कर्णो बहिर्गच्छति वेश्मन:।
तदा गवां वृषाणां च गुरूणां च क्षयो भवेत्॥
ईशान्येकडील भिंत बाहेर आलेली असल्यास गाई,बैल गुरु यांचा नाश होतो.
अर्थात पशुधन हानी.
मत्स्यपुराण अध्याय २५६
मध्ये सांगितले आहे,
यदि संवर्धयेत गेहं सर्व दिक्षु विवर्धयेत् ।
घराची वाढ करायची झाल्यास सर्व दिशेने करावी.
पूर्वेन वर्धितं वास्तु कुर्याद् वैराणी सर्वदा ॥२९॥
पूर्वेची वाढ वैरत्व वाढवते अर्थात शत्रुत्व वाढवे.
दक्षिणे वर्धितं वास्तु मृतुव्ये स्यान संशय:।
दक्षिण दिशेस घराची वाढ केल्यास मृत्यूसमान घटना घडतात.
अर्थात गंडांतर, मृत्यू क्लेशदायक पिडा निर्माण होतात.
पश्चाद विवृध्दं यद वास्तु तदर्थक्षय कारकम्॥३०॥
पश्चिम दिशेची वाढ केल्यास धनाचा क्षय म्हणजे अनाठायी अर्थात अयोग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होतो.
वर्धापित्तं तथा सौम्ये बहुन्तापकार कम्।
उत्तर दिशेची वाढ संतापजन्य स्थिती निर्माण करते.
अशाच प्रकारे उपदेशातील वाढदेखील अशुभ सांगितलेली आहे.
अग्नेयची वाढ अग्निभय,नैऋत्येची वाढ पुत्रपिडा,वायव्येची वाढ व्याधिभय,ईशान्येची वाढ अन्न नाश.

माझ्या बारा ते पंधरा वर्षांच्या अभ्यासात बऱ्याच केस स्टडीमध्ये असे आढळते की,ज्या घराची वायव्य दिशा वाढलेली आहे अर्थातच त्या घराची ईशान्य कट होते.संतती होण्यास अनेक प्रॉब्लेम दर्शवतात,काही घरांमध्ये संतती आहे,पण त्या घराशी त्यांचं नातं समाधानकारक नाही.संतती व्यसनी किंवा निरोगी नाही.
तसेच कितीही मिळवून जमाखर्चाचे पारडे अनियंत्रित रहाते.कशाचा कशाला मेळ नसतो.घराचा पुढचा प्रवास खुंटलेला दिसतो.उदा.वायव्य भिंत वाढीव असेल तर साहजिकच ईशान्य कट होते.ईशान्य कट झाल्यामुळं तेथील जलतत्त्वाचा संकोच होऊन,इतर तत्त्वे बिघडून,समोरच्या असणार्या पृथ्वी तत्त्वावर त्याचा परिणाम होऊन,साहजिकच त्या घरामध्ये भरण पोषण,संवर्धन याचा विकास थांबतो असे पाहण्यात येते.
(ग्रंथसंदर्भ-बृहत् संहिता,मत्स्यपुराण,वास्तु-शतसुत्रे ले.गुरुवर्य य.न.मग्गीरवार,सुखी वास्तु-ले.पुरुषोत्तम बेहेरे.)
क्रमशः
प्रभाकर जंगम
मो.९८६०८२५९९३
(ज्योतिषशास्त्री वास्तुसल्लागार)
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हेही वाचा…
वास्तु म्हणजे काय ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा













































































