Last Updated on 17 Aug 2023 11:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक,डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना वाढणार महिना 8 हजार मानधन
पुणे । राज्यातील रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना नुकतीच महिन्याला प्रत्येकी 8 हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे.
रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेने 6 महिन्यापूर्वी राज्यभर सुरु केलेले काम बंद आंदोलन केले होते.मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत शासनाकडून आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
या होत्या मागण्या
मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करुन कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे,पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे,योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी,ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यात याव्यात,मध्यप्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले होते.
![]()

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करा
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
लठ्ठपणाने त्रस्त आहात? तर तुम्हाला सोडाव्या लागतील या सवयी
अंधश्रध्देचा बाजार : सुशिक्षित लोकही भोंदूबाबांच्या जाळ्यात !
डेंग्यू : लक्षणे आणि औषधोपचार
![]()
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना महिन्याला प्रत्येकी 8 हजार रुपये मानधन वाढ करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला आहे.राज्यातील सुमारे 3 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.सदरची मानधन वाढ दिनांक 1 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.दरम्यान,फरकाची रक्कम गणना करून संबंधीतांना प्रदान करण्याची कार्यवाही तातडीने सुरु झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्लर्क कम डाटा एंन्ट्री ऑपरटेर संघटना अध्यक्ष अशिष पाणतावणे,सचिव जितेंद्र वाळके,राज्यसंघटक कमलेश सुगंधे,मार्गदर्शक अमोल महामुने,टुनेश पारधी,जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कदम,रियाज शेख,वैभव सोनुने,विष्णु राठोड,गंगेश अल्लीवार,रामेश्वर कुबेर,बाबासाहेब थोटे,जितेंद्र सुरडकर आदींनी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांना भेटून मानधन वाढीबद्दल आभार मानले.दरम्यान,कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितल्याचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे राज्य सह सचिव अमोल पवार व क्लर्क कम डेटा एन्ट्री संघटनेचे राज्य संघटक मच्छिंद्र पाटील सांगितले.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे राज्य सह सचिव अमोल पवार व क्लर्क कम डेटा एन्ट्री संघटनेचे राज्य संघटक मच्छिंद्र पाटील,सांगली जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सहदेव वाघमोडे,तांत्रिक सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष कुमार माळी आणि क्लर्क कम डेटा एन्ट्री संघटनेचे अध्यक्ष विजय निकम,उपाध्यक्ष सविता रजपूत यांनीही या मानधन वाढीबाबत समाधान व्यक्त केले आहे.जिल्हाध्यक्ष विजय निकम,राज्य संघटक सविता रजपूत,तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष कुमार माळी,सुजय आवटी,कृष्णा गोसावी यांनी मानधन वाढीसाठी प्रयत्न केले.सहाय्यक कार्यक्रमाधिकारी संघटनेचे सहदेव वाघमोडे सचिन खबाले अमोल पवार आदींनी मानधन वाढीसाठी प्रयत्न केले. ![]()











































































