Last Updated on 14 Aug 2026 10:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोफत प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू
कराड ।
शिवनगर येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ (राहुरी) संलग्नित ‘जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात’ शैक्षणिक वर्षासाठी बी.एस.सी. (ऑनर्स) कृषि या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. कृषि शिक्षणात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
कॅप राउंड प्रक्रियेदरम्यान प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचा कॉलेज कोड १११३३ असा आहे.
प्रवेश अर्ज कसा भरावा, ऑप्शन फॉर्म कसा नोंदवावा आणि कॅप राउंड प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विशेष मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महाविद्यालयात प्राधान्यक्रम नोंदवणे आणि एकूणच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना प्राध्यापकांकडून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.
दर्जेदार शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक प्रक्षेत्र आणि उत्कृष्ट प्लेसमेंटचा वारसा असलेल्या या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













































































